S M L

रूपयाची घसरण सुरूच

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2013 03:01 PM IST

रूपयाची घसरण सुरूच

rupiya327 जून : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे आर्थिक जगतात चिंतेचं वातावरण आहे. रुपयाची किंमत डॉलरमागं 60 रूपये 40 पैसे इतकी झाली आहे. यामुळे आयात, परदेशी प्रवास आणि परदेशी शिक्षण घेणं महाग झालं आहे.

आज सकाळी इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची भरपूर विक्री झाली, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची किंमत इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत घसरली. त्याचबरोबर देशी बाजारात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणकदारांनी गुंतवणूक केली. या कारणांमुळे रुपयाचा भाव काहीसा वधारला आहे.

रूपया घसरणीमागे अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी आलेल्या मंदीचं कारण सांगितलं जातं. मंदीच्या काळात अमेरिके नं मोठ्याप्रमाणावर डॉलरची गुंतवणूक केली होती. आता ती गुंतवणूक भरून काढण्यासाठी अमेरिकेनं कंबर कसली आहे त्यामुळे जगभरात चलनामध्ये चढउतार सुरू असून याचा सर्वात जास्त फटका भारताला बसला आहे. मात्र अजूनही या आरबीआयने हस्तक्षेप करायला नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2013 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close