S M L

सावधान, तुमच्या मिठाईत विष तर नाही ना?

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2014 10:43 PM IST

सावधान, तुमच्या मिठाईत विष तर नाही ना?

diwali sweets422 ऑक्टोबर : या दिवाळीत मिठाई खाताना जरा सांभाळून..कारण या दिवाळीत बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई आली आहे. मिठाईची मागणी वाढल्यामुळे ती बनवताना भेसळयुक्त पदार्थांचा वापर करण्यात यतोय.

दिवाळी सुरू होताच मिठाईची मागणी जोरात असते. पण, मिठाई घेताना ती तुमच्या आरोग्याला घातक तर ठरणार नाही ना, याची खात्री करून घ्या... दिवाळीत मिठाई आणि मिठाई बनवण्यासाठी लागणार्‍या पदार्थांची मागणी आणि त्याची किंमत वाढते. त्यामुळे मिठाईची किंमत कमी ठेवण्यासाठी दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर सर्रास केला जातो.

विषारी मिठाई !

- राजधानी दिल्लीत अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 1800 दुकानांची तपासणी केली

- यातल्या 731 दुकानांमधली मिठाई भेसळयुक्त म्हणजे खाण्यायोग्य नसल्याचं उघड झालं.

- महाराष्ट्रात जवळपास 1 कोटी रुपयांचं भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आलेत.

दिल्लीत अन्न आणि पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यावेळी सीएनएन आयबीएनची टीमही त्यांच्याबरोबर होती. इथे दिल्ली सरकारच्या अन्न विभागाकडून छापा टाकण्यात आलाय. सीएनएन आयबीएन या टीमबरोबर आहे. हे अधिकारी इथल्या अन्नपदार्थांची तपासणी करतात. खव्याचा रंग कसा आहे, मिठाई बनवण्यासाठीच्या पदार्थांची तपासणी केली जाते. अशा प्रकारे तपासणी करताना, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं का ? दुकानांमधून सॅम्पल घेतल्यावर ते एका बरणीत ठेवले जातात. या सॅम्पल्सची मग प्रयोगशाळेत चाचणी केली जाते. इतकी कारवाई होऊनही या विषारी मिठाईची विक्री काही कमी झालेली नाही.

भेसळखोरांना शिक्षा ?

- अन्न सुरक्षा कायद्यानुसार भेसळयुक्त पदार्थ विकणार्‍यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो

- निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणार्‍यांना जास्तीत जास्त 10 लाखांचा दंड होऊ शकतो

- आणि भेसळयुक्त पदार्थ खाल्याने कुणाचा मृत्यू झाला तर सात वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते

पण, या सर्व कायद्यांचा धाक आहे, असं दिसत नाही. उत्सवकाळात तर भेसळीला ऊत येतो. साडे सहाशे रुपये किलोची काजू कतली फक्त 55 रुपयांना बनवली जाते, इतकी भेसळ होत असते.तेव्हा या दिवाळीत तोंड गोड करताना थोडं सांभाळून..

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 10:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close