S M L

'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

नागपुरात आज या सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण तिथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही पत्रकार परिषद हाणून पाडली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 16, 2017 02:11 PM IST

'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

16 जुलै : मधुर भांडारकरच्या इंदू सरकार या सिनेमाला पुण्यात विरोध झाल्यानंतर आज नागपुरातही या सिनेमा विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सिनेमाचं प्रमोशन होऊ दिलं नाही.

नागपुरात आज या सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण तिथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही पत्रकार परिषद हाणून पाडली.

यामुळे पत्रकार परिषदच रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला आणि प्रमोशन न करताच माघारी परतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close