S M L

'पद्मावती'मध्ये झळकणार ऐश्वर्याचं सौंदर्य

नुकतीच ऐश्वर्या आणि भंसाळीची सेटवर भेट झाली. त्यातच ऐश्वर्या सिनेमात असेल हे नक्की ठरलंय.

Sonali Deshpande | Updated On: May 12, 2017 03:00 PM IST

'पद्मावती'मध्ये झळकणार ऐश्वर्याचं सौंदर्य

12 मे : संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावती'ची रोजच काही बातमी येत असते.  आता बातमी अशी आहे की सिनेमात दीपिका पदुकोण,शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या बरोबर अजून एक एन्ट्री होतेय. आता सिनेमा भंसाळीचा म्हटलं म्हणजे त्याचीच फेवरिट असणार. बरोबर ओळखलंत, ऐश्वर्या राय.  ऐश्वर्या राय बच्चन सिनेमात गेस्ट आर्टिस्ट म्हणून असेल.

नुकतीच ऐश्वर्या आणि भंसाळीची सेटवर भेट झाली. त्यातच ऐश्वर्या सिनेमात असेल हे नक्की ठरलंय.

हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश हे सिनेमे ऐश्वर्यानं भंसाळीच्या दिग्दर्शनाखाली केलेत. पण सध्या खूप दिवसांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं नाही. 'पद्मावती'मध्ये ऐश्वर्याची व्यक्तिरेखा काय असेल हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2017 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close