S M L

वाढदिवस साजरा करणार नाही आणि करू देणारही नाही - अमिताभ बच्चन

अमिताभ आपल्या वाढदिवसाला एका अज्ञात ठिकाणी जाणार आहेत. असं ठिकाण ज्याबद्दल कोणालाच काही माहीत नाहीय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 8, 2017 02:04 PM IST

वाढदिवस साजरा करणार नाही आणि करू देणारही नाही - अमिताभ बच्चन

08 आॅगस्ट : अमिताभ बच्चन 11 आॅक्टोबरला 75 वर्षांचे होणार आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करायचे अनेकांचे अनेक प्लान्स सुरू झालेत. पण बिग बींनी सगळ्यांना आपला वाढदिवस साजरा करू नका म्हणून सांगितलंय.

आपल्या ब्लाॅगवर बिग बी म्हणतात, 'माझ्या 75व्या वाढदिवसाला अनेक प्लान्स बनतायत. पण त्या दिवशी कुठलाच सोहळा होऊ नये, असं मला वाटतंय. कोणी काही आयोजन करत असेल, तर त्यांनी ते रद्द करावं. मी कुणालाच अशी काही परवानगी देत नाहीय. माझ्या कुटुंबालाही नाही. कुणी काही ठरवत असेल तर त्यांनी ते रद्द करावं. '

अमिताभ आपल्या वाढदिवसाला एका अज्ञात ठिकाणी जाणार आहेत. असं ठिकाण ज्याबद्दल कोणालाच काही माहीत नाहीय.

सध्या बिग बी 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान' आणि '102 नाॅट आऊट' या सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. शिवाय 'कौन बनेगा करोडपती'चं शूटही सुरू होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close