S M L

लारा दत्ताची दुसरी वेबसाइट लॉन्च

4 फेब्रुवारी मुंबईपिया हिंगोरानी लारा दत्तानं आपली दुसरी वेबसाइट लॉन्च केली आहे. त्या वेबसाइटचं नाव आहे माय लारादत्त डॉट कॉम. या वेबसाइटमध्ये लारा दत्ताच्या अख्ख्या आयुष्याचा जीवनपट आपल्यासमोर उभा राहतो. त्यात तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल बरंच काही वाचायला मिळतं. रॅम्प ते बिग स्क्रिन असा तिचा प्रवास हायलाईट केला गेला आहे.एक वेबसाईट लाँच करून लारा दत्ता गप्प बसली नाही तर आता तिने तिची दुसरी वेबसाईट माय लारादत्ता डॉट कॉम लाँच केली. तिच्या फॅन्सना ती ऑनलाईन भेटण्याची चांगलीच संधी आहे.लारा दत्ता सांगते, प्रत्येक कलाकाराची वेबसाइट ही स्पेशल असते. ऑन स्क्रिन तुमच्या आवडत्या कलाकाराची भूमिका बघण्यापेक्षा त्याबद्दल जाणून घेण्याची ती एक संधी असते. लारा सांगते, या वेबसाइटवर मी ब्लॉग लिहिणार आहे. त्यात मला आधीची मी आणि आताची मी हे सांगायला आवडेल. एखाद्या कलाकाराला आपलं काम समजण्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. सिनेमा रिलीज झाल्यावर लोकांना काय आवडलं किंवा आवडलं नाही हे त्यातूनच समजू शकेल. प्रेक्षक तुम्हांला पसंत करतात की नाही हे त्याद्वारे समजू शकतं.तर आता जर तुम्हाला लाराची आवडती डिश कोणती किंवा तिचं आवडतं हॉलिडे स्पॉट कुठलं हे जाणून घ्यायचं असेल तर मग वेळ न दवडता तिच्या वेबसाइटवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 02:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close