S M L

संजय दत्तला आणखी एक महिन्याची वाढीव सुट्टी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2014 02:24 PM IST

Image img_236042_sanjayduttrelif_240x180.jpg20 जानेवारी : अभिनेता संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव रजा मिळाली आहे. पत्नी मान्यता दत्तची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून संजय दत्त 21 डिसेंबरपासून सुट्टीवर आहे त्याला आणि आता आणखी एक महिन्याची रजा वाढवून देण्यात आली आहे.

संजयसोबत या प्रकरणात सहआरोपी असलेला झैबुनिस्सा झैबुन्नीसा काझीलाही 30 दिवसांची रजा पुणे विभागीय आयुक्तांनी मंजुर केली आहे. गेल्या वर्षी विभागीय आयुक्तांकडून झैबुनिस्सा यांचा पॅरोल अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळे झैबुनिस्सा यांना पहिल्यांदाच पॅरोल मंजूर करण्यात आला आहे मात्र, संजयला आतापर्यंत अनेकवेळा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

संजयच्या सुट्‌ट्या- संजय दत्तच्या 7 महिन्यांच्या सुट्टीत त्याला 3 महिन्यांची सुट्टीच मिळालीय

  • 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
  • 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
  • 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ
  • 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी
  • 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2014 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close