S M L

26/11 चा कट पाकिस्तानात रचला गेल्याची पाकची कबुली

24 फेब्रुवारीमुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची कबुली पाकिस्ताननं दिली आहे. पण त्याचबरोबर पाकिस्ताननं भारताकडे यासंदर्भात तीस प्रश्नांची मागणी केली आहे. या प्रश्नांची छाननी सध्या भारतीय गुप्तचर संस्थांतर्फे केली जातेय. पाकनं भारताला सोपवलेल्या कागदपत्रांची माहिती डॉन न्यूजकडे उपलब्ध आहे. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं भारताकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यात कसाबचा कबुलीजबाब पाकिस्ताननं मागितला आहे. त्याचबरोबर त्याच्या आय कार्डची कॉपी, तसंच या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इतर दहशतवाद्यांची नावं आणि त्यांच्याविषयी कसाबनं दिलेल्या माहितीचा अहवालही पाकनं मागितला आहे.याशिवाय दहशतवाद्यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड्स. हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी एकमेकांशी केलेल्या संभाषणाची प्रत. त्यांच्या बोटांचे ठसे, तसंच घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेली शस्त्रं. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सर्व दहशतवाद्यांचे डीएनए नुमने. आणि मुंबईत येताना आणलेला जीपीएस डाटा याबाबतची माहितीही पाकिस्ताननं मागितली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2009 11:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2009 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close