S M L

फिल्म रिव्ह्यु : 'शादी के साईड इफेक्टस'

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2014 11:02 PM IST

फिल्म रिव्ह्यु : 'शादी के साईड इफेक्टस'

अमोल परचुरे, समीक्षक

2006 साली साकेत चौधरी या दिग्दर्शकानं 'प्यार के साईड इफेक्टस' हा सिनेमा बनवला होता. त्यावेळीसुद्धा राहुल बोस आणि मल्लिका शेरावत अशी इंटरेस्टींग जोडी त्यात होती. आधुनिक काळात बदलत जाणार्‍या रिलेशनशिपवरचा एक चांगली रोमँटिक कॉमेडी तेव्हा बघायला मिळाली. आता आठ वर्षांनंतर साकेत चौधरी घेऊन आलाय 'शादी के साईड इफेक्टस', म्हणजे एकप्रकारे 'प्यार के साईड इफेक्टस'चा सिक्वेलच.. याही सिनेमाचं वैशिष्टय म्हणजे फरहान अख्तर आणि विद्या बालन अशी जोडी..लग्न, लग्नानंतरचं इक्वेशन, संसारातले ताणतणाव, गैरसमज असे विषय यापूर्वीसुद्धा अनेक सिनेमांमधून आलेले आहेत. 'शादी के साईड इफेक्ट्स'मध्ये हे सगळं आहेच, पण थोड्या गंमतशीर पद्धतीने मांडलेलं आहे. 'प्यार के साईड इफेक्ट्स'मध्ये राहुस बोस हा सूत्रधार होता, तो प्रेक्षकांशी थेट संवाद साधायचा किंवा त्याच्या मनात काय आहे त्या प्रतिमासुद्धा दिसायच्या. शादी के साईड इफेक्ट्समध्ये या फॉरमॅटचा जास्त वापर केलेला नाही. यात फरहान अख्तरचं निवेदन जागोजागी ऐकायला मिळतं, आणि त्यामुळे नवर्‍याच्या, म्हणजेच पुरुषाच्या नजरेतून कथा रचण्यात आलीये हेसुद्धा स्पष्टपणे जाणवतं.

काय आहे स्टोरी ?

3436 shadi ke (2)

सिड आणि त्रिशा या सुखवस्तू जोडप्याची ही गोष्ट. सिड हा गायक-संगीतकार आहे, सध्यातरी जिंगल्स करतोय, स्ट्रगल करतोय, त्रिशा एका कॉर्पोरेट कंपनीत काम करतेय. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम असंच वाढत राहावं यासाठी वेगवेगळ्या आयडियाच ते लढवत असतात. मौजमजेत संसार सुरू असताना त्रिशाला दिवस जातात, आणि इथूनच दोघांचंही आयुष्य बदलून जातं. आई झाल्यावर करिअरीस्ट त्रिशा नोकरीपेक्षा मुलीला प्राधान्य द्यायचं ठरवते, आणि बेस्ट फादर बनण्याच्या प्रयत्नात सिड जास्तीत जास्त खचत जातो. आपल्यातला ताण दूर व्हावा म्हणून सिड खूप प्रयत्न करतो, पण त्रिशा आपल्या मुलीत पूर्णपणे गुंतून गेलेली असते. यातून सावरण्यासाठी किंवा सिडच्या भाषेत सांगायचं तर या बोरिंग लाईफमधून बाहेर पडण्यासाठी तो मित्रांचे सल्ले ऐकतो. त्यातून पुढे काय काय होतं, काही साईड इफेक्ट्स खरंच होतात का ते सिनेमात बघायला मिळेलच..

नवीन काय ?

M_Id_434038_Shaadi_Ke_Side_Effects

शादी के साईड इफेक्ट्समध्ये इंटरव्हलआधीच्या भागात गंमत जास्त आहे. एकापाठोपाठ एक येणारे सीन्स, साकेत चौधरीची वेगवान पटकथा आणि चटपटीत संवादांमुळे सिनेमा चांगली पकड घेतो. काही ठिकाणी खळखळून हसवतोसुद्धा.. यातला कलाकारांचा वाटासुद्धा महत्त्वाचा आहे, पण नवरा-बायकोचं बदलत जाणारं विश्व हे तुकड्या-तुकड्यात समोर ठेवलेलं असल्यामुळे खूप इंटरेस्टींग झालंय, जरी त्यात एकसंधता नसली तरीसुद्धा. दुसर्‍या भागात म्हणजे इंटरव्हलनंतर सिनेमाचा वेगही कमी होतो, ह्युमर हळूहळू नाहीसाच होतो आणि जे नाट्य आहे ते बराच वेळ, अगदी क्लायमॅक्सपर्यंत ताणलं जातं. बोरिंग लाईफमधून बाहेर पडण्यासाठी सिड जे जे करतो, ते हळूहळू त्याच्याच अंगाशी येतं, पण या सगळ्यात लेखक-दिग्दर्शक प्रेक्षकांना बोअर करुन जातो.

परफॉर्मन्स

3436 shadi ke (3)

लेखक आणि दिग्दर्शक साकेत चौधरीने इंटरव्हलनंतर सिनेमा नेहमीच्याच ट्रॅकला आणलेला असला तरी ही कमतरता भरुन काढण्याचं, सिनेमा सावरण्याचं काम करतात फरहान अख्तर आणि विद्या बालन... इंटरव्हलआधीचा कॉमेडी सेन्स असलेला फरहानचा सिड इंटरव्हलनंतर पूर्णपणे बदलून जातो. हा बदल तर फरहानने अगदी सहज दाखवलाय. प्रयोगशील दिग्दर्शक अशी आपली ओळख कायम ठेवून परिपूर्ण अभिनेता ही आपली ओळख आता फरहान आणखी ठळक करतोय असंच वाटतं. विद्या बालननेसुद्धा त्रिशामध्ये होत जाणारे बदल चांगलेच सादर केलेत. लग्नानंतरची मजा-मस्ती, दिवस गेल्यावर आलेली जबाबदारीची जाणीव, आईपण, मुलीसाठी पझेसिव्ह असणं, नवर्‍याच्या विक्षिप्त वागण्यानं गोंधळून जाणं या सगळ्या फेजेस खूपच चांगल्या दाखवल्यात. बाकी राम कपूर, इला अरुण, वीर दास यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिलाय.

रेटिंग - 60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2014 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close