S M L

फिल्म रिव्ह्यु : हॅलो नंदन !

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2014 10:39 PM IST

फिल्म रिव्ह्यु : हॅलो नंदन !

अमोल परचुरे, समीक्षक

..नवे दिग्दर्शक मराठीत वेगळे प्रयोग करताना दिसतायत, नवीन विषय घेऊन त्यावर सिनेमे बनत आहे, त्यातही आजच्या तरुणाईला आवडेल किंवा अगदी आजचे वाटतील असे विषय सादर करण्याकडेसुद्धा कल वाढतोय. हॅलो नंदन या सिनेमाने त्यादृष्टीने प्रयत्न चांगला केलाय, पण एक चांगला सिनेमा बनता बनता राहिला असंच म्हणावं लागेल. सिनेमाची सुरुवात चांगली झालीेये, वेगवान कथानक असलेला एक चांगला थ्रिलर बघायला मिळेल अशी अपेक्षा निर्माण करुन नंतर नेहमीच्याच ट्रॅकवर गेल्यामुळे सिनेमातली रंगतच निघून गेलीये. फोकस हा हरवलेल्या मोबाईल फोनवर असताना त्यात उगाच नको त्या गोष्टी घुसडण्यात आल्यात. विषय फ्रेश असला तरी तो फुलवताना लेखक-दिग्दर्शकाची खूप दमछाक झाली असं वाटत राहतं.

काय आहे स्टोरी ?

hello nandan

हॅलो नंदन

नंदन दीक्षित हा एक चित्रकार आहे, चित्रकलेतून फारशी कमाई होत नसल्यामुळे तो मनाविरुद्ध नोकरी करतोय. संपन्न घरातला असला तरी स्वावलंबी आहे. ट्रेन आणि बसमध्ये धक्के खात त्याचं धकाधकीचं आयुष्य सुरू आहे, आणि अशाच एका प्रवासात त्याचा मोबाईल चोरीला जातो. मुंबईसारख्या शहरात मोबाईल चोरीला जाणं ही नेहमीची गोष्ट असली तरी नंदन मोबाईल मिळवण्याच्या मागे लागतो, पण त्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करायला लागतो अशी साधारण गोष्ट आहे. आता त्यात नंदनचा प्रेमभंग, मग दुसरी हिरॉईन, कॅब्रेच्या नावाखाली आयटम साँग्ज आणि त्यानंतर नंदनचं स्वत:ला शोधणं यामध्ये बराच वेळ घालवलेला आहे. सिनेमाची सुरुवात झाल्यावर एडिटिंगचा एक वेगळा प्रयोग दिसतो. एक प्रसंग सुरू असताना मध्येच थोडं रिवाईंड होऊन आधी काय घडलं ते दिसायला लागतं. प्रयोग वेगळा होता, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. 'मेमेन्टो'सारख्या इंग्लिश सिनेमात शोभून दिसणारी ही स्टाईल 'हॅलो नंदन'मध्ये फार सूट झाली नाही.

परफॉर्मन्स

हॅलो नंदन

फ्रेश विषय, वेगळ्या मांडणीचा थोडा प्रयत्न याशिवाय सिनेमाची जमेची बाजू म्हणजे आदिनाथ कोठारे..नंदनच्या रोलमध्ये त्याने तगडा परफॉर्मन्स दिलाय आणि त्याला लूकही चांगला देण्यात आलाय. रफ अँड टफ नंदन, रोमँटिक नंदन किंवा अगदी त्रस्त झालेला नंदन त्याने चांगलाच साकारलाय. कोणत्याही प्रकारच्या रोलमध्ये आपण शोभून दिसतो हेच आदिनाथने यातून दाखवून दिलंय. बाकी कलाकारांमध्ये अनंत जोग आणि नीना कुलकर्णी यांनी नेहमीसारखा कडक परफॉर्मन्स दिलाय.

रेटिंग 100 पैकी 50

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2014 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close