S M L

फिल्म रिव्ह्यु : प्रेमाची 'दावत'

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2014 11:13 PM IST

फिल्म रिव्ह्यु : प्रेमाची 'दावत'

अमोल परचुरे, समीक्षक

दावत ए इश्क... यशराजने आत्तापर्यंत प्रेमाची भरपूर दावत प्रेक्षकांना दिलेली आहे. पण याच प्रेमाला चांगल्या कथेचा, एखाद्या ज्वलंत समस्येचा तडका देऊन आशयघन कमर्शिल सिनेमे देण्याचेही चांगले प्रयत्न गेल्याकाही काळात केलेले आहेत. 'इशकजादे'सारखा सिनेमा उदाहरणादाखल सांगता येईल. तरुण विचारांचे, नव्या फळीचे, नव्या दमाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन या सिनेमाचंी निर्मिती करण्याचा प्रयत्न आदित्य चोप्राकडून होतोय, त्याचं कौतुक नक्कीच करावं लागेल.

dawat e isaq3आता दावत-ए-इश्कमध्येसुध्दा हिरो-हिरोईनच्या प्रेमाला पार्श्वभूमी आहे ती हुंड्यासारख्या समस्येची...हुंडा या समस्येवर आत्तापर्यंत अनेक कलाकृती येऊन गेलेल्या आहेत, पण त्यातल्या बर्‍याचशा फिल्मी स्वरुपाच्या किंवा भडक होत्या, त्यात मेलोड्रामा होता, पण हबीब फैजल या दिग्दर्शकाने भारतीय समाजात खोलवर रुतलेल्या हुंडा या विषयावर एक चांगला कमर्शिअल सिनेमा बनवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. अर्थात, इंटरव्हलनंतर हा प्रयत्न फसल्यासारखा झालाय.

काय आहे स्टोरी ?

dawat e isaqहैदराबादमध्ये मध्यमवर्गीय मोहल्ल्यात राहणारं नायिका गुल्लूचं कुटुंब..गुल्लूचे वडील हायकोर्टात कारकून आहेत. प्रामाणिक असल्यामुळे वरकमाई अजिबात नाही. गुल्लूची स्वप्नं मोठी आहेत आणि तिचं लग्न ठरवण्यासाठी तिच्या वडिलांचा आटापिटा सुरू आहे. लग्न होण्यात अडचण आहे ती हुंड्याची...कसेबसे पंधरा लाख रुपये हातात आहेत आणि एवढ्याशा पैशात चांगल्या घरचं स्थळ मिळत नाहीये.

सतत होणार्‍या अपमानानंतर स्वाभिमानी गुल्लू ठरवते की हुंडाविरोधी कायद्याचा वापर करुन पैसे कमवायचे..या तिच्या प्लॅनचं पुढे काय काय होतं त्याची धमाल सिनेमात आहे, अर्थात, इंटरव्हलनंतर ही धमाल गोष्ट एका टिपिकल यशराज स्टाईल लव्हस्टोरीसारखीच झालीये आणि त्यामुळे या दावत चा आस्वाद घेताना सुरुवातीला जे पानात वाढलंय ते लज्जतदार वाटतं पण नंतर जे पदार्थ येतात ते फार चवदार नाहीयेत.

रेटिंग 100 पैकी 50

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 11:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close