S M L

रिव्ह्यु : मितवा

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2015 08:24 PM IST

रिव्ह्यु : मितवा

अमोल परचुरे, समीक्षक

मितवा फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड म्हणजेच मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या...नाही म्हणजे असं भाषांतर सिनेमातच केलेलं आहे. नात्याचे कोणतेही बंध नसलेलं, कोणतीही बांधिलकी किंवा कमिटमेंट नसलेलं असं नातं. नात्यांचं हे आधुनिक रुप मराठीसाठी तरी नवीन आहे. मराठीमध्ये अजुनही लव्हस्टोरी म्हटलं की, ती जुन्याच वळणाची असते, याचं कारण ती प्रेक्षकांना झेपेल की नाही याची भीती निर्मात्यांना वाटत असते. तेच मराठी प्रेक्षक हिंदी सिनेमांमधला बोल्ड किंवा धाडसी विषयावरचा सिनेमा सहज पचवतात.

त्याअर्थाने बघितलं तर मितवा हा नव्या वाटेवरचा सिनेमा ठरू शकतो, पण असं वाटत असतानाच सिनेमा कॉलेजच्या पातळीवरची प्रेमकथा होऊन जाते आणि प्रेक्षक म्हणून थोडी निराशा होऊ शकते. मितवाचं वैशिष्ट्य हे आहे की मराठी नायक, नायिका यांना श्रीमंत रुपात सादर केलेलं आहे. हिंदी सिनेमात शोभावेत असे लोकेशन्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरोला स्टाईलाज्ड वर्जनमध्ये पेश केलेलं आहे. हेलिकॉप्टर उडवणारा, मर्सिडीजमधून फिरणारा असा नायक यामधून दिसतो जे एकूणच मराठी सिनेमाचं चित्र सुधारण्यासाठी खूप आवश्यक होतं.

काय आहे स्टोरी ?

शिवम आणि नंदिनी यांची ही लव्हस्टोरी आहे. गुलछबू शिवम आणि सरळसाधी नंदिनी यांच्यात प्रेम फुलणं हे तसं कठीणच, पण शिवम पहिल्याच नजरेत नंदिनीच्या प्रेमात पडलाय. नंदिनीचं प्रेम मिळवणं हे शिवमचं ध्येय आहे, पण नंदिनीच्या मनात काय आहे त्याला कळत नाहीये. नंदिनीचा भूतकाळ समजल्यावर आणि तिच्याकडून नकार मिळाल्यावर शिवम काही काळ निराश होतो. या सगळया काळात शिवमची मैत्रीण अवनी त्याच्यासोबत असते, त्याला समजून घेत असते. शिवम आपल्यावर प्रेम करत नाही याची जाणीव असूनसुद्धा ती शिवमची साथ सोडत नाही. यानंतर शिवम आणि नंदिनीमध्ये जे काही घडतं ते फारसं पटत नाही, आत्तापर्यंत प्रगल्भपणे वागणारी ही कॅरेक्टर्स अचानक कॉलेजवयीन प्रियकर-प्रेयसीसारखे का वागतायत हेच कळत नाही.

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2015 08:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close