S M L

फिल्म रिव्ह्यु : सिद्धांत

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 10:10 PM IST

फिल्म रिव्ह्यु : सिद्धांत

अमोल परचुरे, समीक्षक

सिद्धांत या सिनेमाचं बलस्थान काय असेल तर ते त्याचं लेखन...यामध्ये पुस्तकातलं गणितही आहे आणि जगण्यातलं गणितही आहे. पुस्तकी गणित सोडवण्याचा एक फॉर्म्युला असतो, पण जगण्यातलं गणित जर बिघडलं तर ते सोडवण्याचा एकच एक मार्ग असेल असं नाही, हे गणित वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवलं जाऊ शकतं, किंवा काही वेळा हे सगळे फॉर्म्युले एकाचवेळी वापरावे लागतात. सिद्धांतचा आशय एवढा श्रीमंत आहे की, त्यातून असे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. म्हटलं तर दिवेआगरसारख्या गावातल्या एका कुटुंबाची ही गोष्ट आहे, पण एका घटनेमुळे या कुटुंबाचं गणित बिघडतं पण त्याच घटनेमुळे बरेच गुणाकार-भागाकार म्हणजे बरीच उलाढालही होते आणि गणित आयुष्यभरासाठी सुटून जातं.

काय आहे स्टोरी ?

लेखन जेवढं तगडं आहे, तेवढ्याच प्रभावी पद्धतीने सिनेमा सादर करायचा प्रयत्न दिग्दर्शक विवेक वाघनी केलेला आहे, पण हा प्रयत्न वेगवान झालेला नाहीये, सिनेमातल्या काही प्रसंगांची आवश्यकता लक्षात येत नाही. सिनेमात व्यक्तिरेखांची ओळख होत असताना वेगळ्या प्रकारची मांडणी दिग्दर्शकाने केलेली आहे, पण काही ठिकाणी अतिप्रयोगशील झाल्याचा विपकरत परिणाम सिनेमावर झालेला आहे. ग्रीक गणितज्ञांपासून ग्रीक रेसिपी बकलावापर्यंत असा सिनेमाचा प्रवास आहे, पण क्लायमॅक्समध्ये सगळं अचानक जमून आल्यासारखं वाटतं. गणितात बाकी शून्य आली की, गणित सुटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात बाकी शून्य आली म्हणजे शेवट गोड झाला असं होतंच असं नाही, सिद्धांत काय ते तुम्हाला सिनेमा बघूनच समजू शकेल. बाकी तांत्रिक बाबतीत सिनेमा छान जमून आलेला आहे.

परफॉर्मन्स

संगीतकार शैलेंद्र बर्वेने पार्श्वसंगीतातही काही वेगळे प्रयोग केलेले आहेत. सिध्दांत सिनेमाची सर्वात मोठा प्लसपॉईंट आहे अभिनय. लहान अर्चित देवधरपासून ग्रेट विक्रम गोखलेंपर्यंत.. दिग्दर्शकाचं कौतुक म्हणजे लहान लहान भूमिकांसाठीसुद्धा अनुभवी कलाकारांची निवड... माधवी सोमण आणि गणेश यादव यांचा खास उल्लेख करावा लागेल. स्वाती चिटणीस यांची बर्‍याच काळानंतर सिनेमातली एवढी मोठी भूमिका बघणं हासुद्धा आनंददायी अनुभव आहे..

रेटिंग 100 पैकी 60

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 10:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close