S M L

रिव्ह्यु : सिनेमाचाच 'मर्डर' मेस्त्री !

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2015 04:41 PM IST

रिव्ह्यु : सिनेमाचाच 'मर्डर' मेस्त्री !

अमोल परचुरे, समीक्षक

मराठीत तर जुलै महिन्यात सिनेमांचा पाऊस पडतोय, आणि एकाच आठवड्यात सिनेमाचंी गर्दी झाली की त्यांचं शटर कसं बंद होतं तेही बघायला मिळतंय. आता या आठवड्यात तरी एकच मराठी सिनेमा आहे, मर्डर मेस्त्री...पण एकमेव सिनेमा जरी असला तरी प्रेक्षकांना वैधानिक इशारा द्यावा लागतोय. हा इशारा म्हणजे हा सिनेमा डोकेदुखीला आमंत्रण देणारा ठरू शकतो. 'कॉमेडी एक्स्प्रेस' किंवा 'फू बाई फू' मधले स्कीट एकत्र करुन मोठ्या पडद्यावर पाहिले तर जे काही होईल ते या 'मर्डर मेस्त्री'चं झालेलं आहे. थोडक्यात, सिनेमाचाच मर्डर झालेला आहे. चांगले कलाकार घ्यायचे, चमकदार कल्पना घ्यायची आणि त्यावर जसं सुचेल तसं लिहीत जायचं आणि जसं जमेल तसं शूट करत जायचं असा हा सगळा भुसभुशीत कारभार आहे. दुदैर्वाने सध्या मराठी इंडस्ट्रीत बनणारे 90 टक्के सिनेमे हे अशाच प्रकारे बनतायत. प्रेक्षकांना काय आवडतंय हे फक्त आपल्यालाच माहितीये अशा आविर्भावात हे असे सगळे सिनेमे बनवले जातात आणि मग प्रेक्षकांनी नाकारल्यानंतर प्रेक्षकांनाच दोष दिला जातो. मर्डर मेस्त्रीबद्दल हेच घडणार आहे.

काय आहे स्टोरी ?

मर्डर मेस्त्री हे नाव आकर्षक असलं तरी कथेमध्ये खूप घोळ आहेत. आम्ही फक्त मनोरंजन हा एवढा एकच हेतू डोक्यात ठेवून सिनेमा बनवलाय असा दावा जरी निर्माते-दिग्दर्शक करत असले तरी मनोरंजन करायलाही मेहनत करावी लागते. कथा-पटकथा लिहीताना फक्त लेाकेशनचाच विचार केला गेलाय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कल्पना तर चमकदार आहे, पण त्याच कल्पनेच्या प्रेमात पडल्यामुळे पुढचं सगळं आरामात होऊन जाईल अशा भ्रमात राहिल्यामुळे सिनेमाचा डोलारा पूर्णपणे कोसळलेला आहे. कॉमेडी आहे मान्य आहे, फँटसी आहे हेसुद्धा मान्य आहे, पण म्हणून पोस्टकार्डवर मर्डरचे प्लॅन लिहीणारे लोक दाखवले तर ते कसं पचनी पडेल याचा विचार खरंतर आधी व्हायला हवा होता. राहुल जाधवसारख्या दिग्दर्शकाने यापूर्वी हॅलो नंदनसारखा बरा सिनेमा केलेला आहे, पण मग यावेळी काय झालं ही मिस्ट्री सुटणं अवघड आहे.

परफॉर्मन्स

muder mestri 3मर्डर मेस्त्रीमध्ये सगळेच अनुभवी कलाकार आहेत. दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते यांनी नवीन काही केलेलं नसलं तरी त्यांच्या सीन्समध्ये बर्‍यापैकी धमाल येते. अशीच धमाल येते क्रांती रेडकरचं कॉमेडीचं टायमिंग बघून...नवर्‍याबरोबर काहीशी विक्षिप्तपणे वागणारी, पण मनात वेगळेच डाव रचत असलेल्या बायकोचा रोल क्रांतीने ऊलातून केलेला आहे. मानसी नाईक आणि विकास कदम यांच्यातल्या सेक्स कॉमेडीचा बराच अतिरेक झालाय. बाकी हृषिकेश जोशीने नेहमीसारखं पिचवर टिकून राहून बॅटिंग केलेली चांगली केलीये, पण तो यलो किंवा पोश्टर बॉईजसारखा स्कोअर करु शकला नाहीये.

रेटिंग 100 पैकी 30

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2015 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close