S M L

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा 'दृश्यम'

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 05:47 PM IST

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा 'दृश्यम'

अमोल परचुरे, समीक्षक

दृश्यम... हा सिनेमा बघून उस्फूर्तपणे मनात आलेला हा विचार...निशिकांत कामत इज बॅक...नाटक-एकांकिकांच्या दिवसांपासूनच त्याच्यातला स्पार्क दिसत होताच, मग आला 'डोंबिवली फास्ट', जो फक्त इथेच नाही तर देशभरात गाजला, दक्षिणेत त्याचा रिमेकही झाला. त्यानंतर 'फोर्स' आणि 'लय भारी' आले, जे व्यावसायिक सिनेमे होते, आता दृश्यम हासुद्धा व्यावसायिक सिनेमाच आहे, पण दृश्यममध्ये निशिकांत कामत मधल्या दिग्दर्शकाचा जो खरा फोर्स आहे तो बघायला मिळाला. म्हणूनच म्हणावंसं वाटलं, निशिकांत कामत इज बॅक... आता कुणी म्हणेल की हा तर रिमेक सिनेमा आहे, मग त्यात दिग्दर्शकाचं कसब ते काय? जरी हा सिनेमा यापूर्वी तीन भाषांमध्ये बनलेला असला तरी नव्याने हिंदीत बनवत असताना हिंदी प्रेक्षकांचा विचार करुन त्यात ऍड झालेल्या नवीन गोष्टी, मूळ गाभा तसाच असला तरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचं कसब आणि श्रेय हे लेखक-दिग्दर्शकाला द्यायलाच हवं.

काय आहे स्टोरी ?

drishyam3दृश्यम हा सस्पेन्स थ्रिलर असला तरी यातला सस्पेन्स थोडा वेगळा आहे. गुन्हा कुणी केलाय याचा शोध जरी इथं सुरू असला तरी गुन्हा कुणी केलाय हे प्रेक्षकांना ठाऊक आहे, कारण त्यांच्यासमोरच सगळा प्रकार घडलाय. आता पोलिसांना खरं काय ते कळेल का याचा सस्पेन्स बाकी आहे. इंटरव्हलआधी गुन्हा घडतो आणि इंटरव्हलनंतर त्याचा तपास सुरू होतो. आता सस्पेन्स सिनेमात काही गोष्टी, काही घटना उगीचच घुसडलेल्या असतात, उदाहरणार्थ, काहीतरी अचाट घडतं आणि मग कळतं ते स्वप्न होतं वगैरे...सुदैवाने, तसले कोणतेही प्रकार दृश्यममध्ये होत नाहीत. उलट दृश्यम मध्ये एका कॅरेक्टरच्या तोंडी संवाद आहे, 'दिसतं तसं नसतं, जसं सिनेमा हे माध्यम आहे, जे काही आपल्या समोर घडतंय ते खोटं आहे हे माहित असूनही आपण समोरच्या दृश्यात गुंतत जातो'... यावरुनच तुम्हाला अंदाज येईल की सिनेमाचा ऍप्रोच नेमका कसा आहे ते..

नवीन काय ?

ajay devgan44दृश्यमचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे कास्टींग, अपवाद शि्रया सरनचा...अशा प्रकारच्या सिनेमात अजिबात सूट न होणारी आणि अभिनयात खूपच कमी पडलेली शि्रया सोडली तर बाकीचं कास्टींग खरंच खूप विचारपूर्वक करण्यात आलंय. उदाहरण द्यायचं तर तब्बू आणि रजत कपूर यांचं देता येईल. कडक शिस्तीची इन्स्पेक्टर जनरल अशा रुपात तब्बू दिसते आणि तिचा आक्रमकपणा, हेकेखोर वृत्ती याला बॅलन्स करण्यासाठी संयमी रजत कपूर...तब्बूने तर याही सिनेमात कमालच केलीये, पण रजत कपूरने अडचणीत असलेला बाप कुठेही फिल्मी वाटणार नाही अशाप्रकारे मस्तच सादर केलाय.

परफॉर्मन्स

दृश्यममधलं आणखी एक ब्रिलियंट कास्ंटिग आहे इन्स्पेक्टर गायतोंडेसाठी केलेलं कमलेश सावंत या कलाकाराचं. अनेक सिरीयल्स आणि सिनेमांमधून छोट्या छोट्या भूमिका करत असलेला हा अतिशय गुणी कलाकार..अनेक वेळा त्याने हवालदार किंवा इन्स्पेक्टरचे रोल्स केलेले असले तरी दृश्यममध्ये इन्स्पेक्टर गायतोंडेचा राकटपणा, पैसेखाऊ वृत्ती, असे सगळे खलनायकी ढंग त्याने बरोबर पकडलेले आहेत. प्रेक्षकांना या गायतोंडेचा नक्कीच राग येणार आहे, एवढं कमलेशने चांगलं काम केलेलं आहे.

बाकी साक्षात अजय देवगण सिनेमात आहेत, पण अजय देवगणसुद्धा नेहमीच्या 'ऍक्शन जॅक्सन' किंवा 'सिंघम' रुपात नाहीये, उलट एकही फाईटसीन नाहीये सिनेमात, पण तरीही अजय देवगणने समजून उमजून चांगला अभिनय केलाय. आपल्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभा असलेला विजय साळगावकर उभा करणं हे तसं अजय देवगणसाठी कठीण काम, पण ते त्याने चांगल्यापेकी पेललेलं आहे.

 

रेटिंग 100 पैकी 80

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close