S M L

डेंजर डॅडींचा जबरदस्त 'अंकुश'

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 05:59 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

दगडी चाळ आणि डॅडी अरुण गवळी... कुतूहल निर्माण होतं, अजूनही काही प्रमाणात दहशत आहे. दगडी चाळ म्हणजे डॅडीची राजधानी... या भक्कम तटबंदीला भेदून डॅडीपर्यंत पोचणं हे एकेकाळी अशक्य मानलं जायचं. आता त्या गोष्टींना आणि दंतकथांना अनेक वर्षं लोटली. पण त्या काळातल्या दंतकथा सिनेमासृष्टीला अजूनही आकर्षित करतात. 'सत्या'मध्ये रामगोपाल वर्माने मध्य मुंबईत फोफावणारं टोळ्यांचं राज्य, त्यांना मिळणारं राजकीय पाठबळ आणि या टोळ्या मोडून काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न असं सगळं चित्र पाहिलेलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्या प्रकारचे अनेक सिनेमे येऊन गेले, मराठीतही काही प्रयत्न झाले, पण मराठी डॉन केंद्रस्थानी ठेवून मोठी निर्मिती झाली नव्हती, ती कसर दगडी चाळ सिनेमाने भरुन काढली असं म्हणता येईल.

dagadi_chal_marathi_movie (2)डॅडींच्या भूमिकेत मकरंद देशपांडे आणि सूर्याच्या भूमिकेत अंकुश चौधरी या दोन गोष्टी सिनेमात लक्षणीय आहेत. कथा, दिग्दर्शन, संगीत याहीपेक्षा आधी हे दोघे आणि त्यांचं कास्टींग खूपच महत्त्वाचं ठरलंय. मकरंद आणि अंकुश या दोघांनीही आपली ताकद या सिनेमात दाखवून दिलेली आहे.

'दगडी चाळ' तशी भक्कम आहे. अभिनय, ऍक्शन, डायलॉगबाजी हे दगडी चाळीचे मजले चांगलेच आहेत. पण कथेचा जो मजला आहे तो थोडा डळमळीत आहे. डॅडीची दहशत, टोळीमधली अंतर्गत स्पर्धा, सरळसाध्या मराठी तरुणाचा टोळीत प्रवेश आणि त्या सरळसाध्या तरुणाचं वैयक्तिक आयुष्य...नेमका कशावर फोकस करायचा याबद्दल मेकर्सच्या मनात बरीच संदिग्धता असावी. एका सरळ रेषेत कथा जावी अशी अपेक्षा नाही, पण नेमकं काय सांगायचंय हे स्पष्ट झालेलं नाही. इंटरव्हलआधी नायक अर्थात सूर्याच्या प्रेमप्रकरणात बराच वेळ खर्च झालाय, हा वेळ वाचवायला हवा होता असं वाटतं.

dagadi_chal_marathi_movie (4)पण, या सगळ्या चुका किंवा त्रुटींना बॅलन्स करण्याचं काम करतात अंकुश आणि मकरंद आणि त्यांच्या तोंडी असलेले तगडे संवाद.. सिनेमात वैशिष्ट्यपूर्ण वाटेल अशी आणखी एक गोष्ट बीडीडी चाळ परिसरात शुटिंग झाल्यामुळे वास्तवाची जाण झाली. एकंदरीतच दगडी चाळीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहण्यास मिळाला.

रेटिंग 100 पैकी 60

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close