S M L

धारदार 'तलवार'

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 06:12 PM IST

धारदार 'तलवार'

अमोल परचुरे, समीक्षक

सिनेमा बघून थिएटरबाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात जे सुरू असतं त्यावर सिनेमाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं असं म्हणतात. हल्ली तर बर्‍याचदा थिएटरबाहेर पडताना सुटलो एकदाचे असंच प्रेक्षकांना वाटत असतं. पण 'तलवार' बघून बाहेर पडणारे प्रेक्षक गप्प असतात. शांत असतात. त्यांच्या मनात बरंच काही सुरू असावं. एकूणच व्यवस्थेबद्दलचा संताप, एकंदरित बरबटलेल्या न्याय आणि तपासव्यवस्थेबद्दल बसलेला धक्का, हे सगळं मनात दाटून येत असावं.

talwar 3423'तलवार'ची धारच इतकी टोकदार आहे की, त्याचा प्रेक्षकांवर मोठा परिणाम होणारच आहे. आरुषी तलवार आणि हेमराज या हायप्रोफाईल डबल मर्डर केसवर आधारित याचवर्षी याच विषयावर 'रहस्य' या सिनेमात खूपच फिल्मी लिबर्टी घेण्यात आली होती. 'तलवार'चं नेमकं उलटं आहे. आपण सिनेमा बघतोय हे विसरायला लावणारी ही कलाकृती... विशाल भारद्वाजचं लेखन आणि संगीत...मेघना गुलजारचं दिग्दर्शन...नुसती नावं मोठी आहेत म्हणून नाही तर त्यांचं कामही तसंच...

TALWAR332न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते आणि तिच्या हातात तराजू असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीये, पण तिच्या एका हातात तलवारपण असते..ती तलवार म्हणजे पोलीस, पण सध्या त्या तलवारीवर गंज चढलाय. सिनेमातल्याच एका पात्राच्या तोंडी असलेले हे संवाद... या तीन वाक्यांमध्येच सिनेमाचं सगळं सार आहे. देशाच्या राजधानीत घडलेला डबल मर्डर... ज्याच्या त्याच्या तोंडी याच गुन्ह्याची चर्चा, गुन्हा कसा घडला असेल, कुणी केला असेल याबद्दलचे अंदाज...मीडियामध्ये होणारं रिपोर्टिंग...पण यापेक्षाही तपासयंत्रणा काय करतायत, किंवा कसा तपास झाला असेल.

तपासादरम्यान, पोलीस दलात काय राजकारण रंगलं असेल याचं अगदी तंतोतंत वाटेल असं चित्रण सिनेमात आहे. मीडियातल्या बातम्या वाचत किंवा बघत असताना त्याच्या आत किती गोष्टी दडलेल्या असतील याचा विचार कुणी करुच शकत नाही. समोर जे दिसतंय तेच खरं मानायचं या मानसिकतेचा पोलीस आणि प्रशासनाकडूनही कसा वापर करुन घेतला जातो हे यात दाखवलंय, म्हणजे एकप्रकारे न्यायदेवता नाही तर आपण जनताच कशी डोळ्यावर पट्टी बांधून बसलोय हेही सांगायचा प्रयत्न आहे.

रेटिंग 100 पैकी 90

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close