S M L

नीडर 'नीरजा'ची थरारक कहाणी

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2016 10:44 PM IST

नीडर 'नीरजा'ची थरारक कहाणी

अमोल परचुरे, समीक्षक

'नीरजा' हा सिनेमा येण्यापूर्वी 'नीरजा भानोत'चं धाडस काहीजणांना ठाऊक होतं, पण सिनेमाचे प्रोमोज आल्यावर विमानाचं अपहरण आणि शूरवीर नीरजाची गोष्ट सर्वांना समजली. बरं, प्रोमो आणि ट्रेलरमध्ये गोष्ट लक्षात येते. आता गोष्ट तर समजली, शेवटी काय होतं तेही समजलं, पण तरीही सिनेमा बघायची उत्सुकता कायम राहते. इथंच सिनेमाने बाजी मारली असं म्हणावं लागेल. आता प्रश्न हे उरतात, की सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये दिग्दर्शकाने काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे का ?, सिनेमा वास्तववादी बनवता बनवता फिल्मी तर झाला नाही ना? सुदैवाने, असं काहीही झालेलं नाही. बारीक बारीक गोष्टींचा विचार करत एका दिग्दर्शकाने किती कौशल्याने प्लॅनिंग केलंय, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे नीरजा... सिनेमा मेलोड्रामाकडे झुकण्याची अगदीच दाट शक्यता असताना, सिनेमा बरोब्बर बॅलन्स करणं, हे काम दिग्दर्शक राम माधवानीने अतिशय सुंदररित्या केलेलं आहे.

काय आहे स्टोरी ?

neerja35 सप्टेंबर, 1986 पॅन ऍम कंपनी विमानाचं उड्डाण...त्यानंतर चार दहशतवाद्यांकडून विमानाचं अपहरण आणि त्यानंतर नीरजाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे झालेली प्रवाशांची सुटका... ही साधारण सिनेमाची गोष्ट...अत्यंत कसोटीच्या वेळी सर्वसामान्य तरुणीनं दाखवलेलं असामान्य धाडस हा पुढे इतिहास झाला. राम माधवानी आणि टीमने सिनेमा अगदी टू द पॉईंट ठेवलाय. हळूहळू टेंशन वाढवत नेलंय आणि मग पुढे ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवलीये. कथा माहीत असतानाही प्रेक्षकांनी शेवटपर्यंत सिनेमाबरोबर राहणं, ही दिग्दर्शकाची खरंच खूप मोठी कामगिरी म्हणायला पाहिजे.

परफॉर्मन्स

नीरजा हा सिनेमा म्हणजे सोनम कपूरच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड म्हणता येईल. आत्तापर्यंत तिने 'भाग मिल्खा भाग' सारख्या मोठ्या सिनेमात कामं केलेली आहेत, पण तिच्या अभिनयाची खरी कसोटी लागली ती नीरजामध्ये... इथे अख्ख्या सिनेमाची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती आणि तिने ती चांगल्या प्रकारे पेललेली आहे. 'जज्बा'मध्ये शबाना आझमी यांचं दर्शन घडलं होतं, पण त्यांनी त्यापेक्षा कितीतरी सशक्त भूमिकेत तितकंच मनस्वी काम केलंय, आणि याशिवाय उल्लेख केला पाहिजे तो योगेंद्र टिकू या कलाकाराचा. नीरजाच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांनी खूपच कमाल काम केलंय.

रेटिंग 100 पैकी 80

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2016 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close