S M L

फिल्म रिव्ह्यु - 'भो भो'

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2016 05:10 PM IST

फिल्म रिव्ह्यु - 'भो भो'

अमोल परचुरे, समीक्षक

मराठी सिनेमासृष्टीसाठी हे वर्ष कमाईचं नसलं तरी नवलाईचं आहे हे नक्की...बंध नायलॉनचे, फुंतरू किंवा आज रिलीज झालेला भो भो... प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न होतोय हे महत्त्वाचं...अर्थात, हे प्रयत्न आणखी सफाईदारपणे झाले तर बॉक्स ऑफिसवरही चांगलं चित्र बघायला मिळेल. भो भो या सिनेमात नावापासूनच नावीन्य आहे. प्रशांत दामलेंसारखा कलाकार जो सिनेमापासून तसा लांब लांबच असतो, त्यांना मुख्य भूमिकेत कास्ट करुन सिनेमाबद्दल उत्सुकतासुद्धा वाढवलेली आहे. स्टोरीपण एकदम ओरिजिनल आहे..पण काही स्पीडब्रेकर्समुळे सिनेमाचा परिणाम, सिनेमाचा वेग थोडा कमी झालेला आहे.

काय आहे स्टोरी ?

bho bhoसिनेमाची सुरुवात अतिशय वेगवान होते... शीर्षक सुरू असतानाच विनायक भांडारकर यांच्या घरात एका महिलेचा मृतदेह दिसतो.

बाजूला एक कुत्रा बसलाय. हा कुत्रा पिसाळलेला आहे, वेडा आहे आणि त्यानेच मालकिणीला मारलंय असा पोलिस निष्कर्ष काढतात. इथे एंट्री होते डिटेक्टीव्ह व्यंकटेश भोंडेची... स्वत: श्वानमित्र असलेला या डिटेक्टीव्हला विश्वास असतो की कुत्रा निर्दोष आहे, मग ते तो कसं सिद्ध करतो त्याची ही गोष्ट... आता डिटेक्टीव्ह किंवा गुप्तहेर यांची एक जागतिक स्टाईल आहे.

परफॉर्मन्स

बेनेडिक्ट कंबरबॅचने साकारलेला शेरलॉक असेल किंवा रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने साकारलेला शेरलॉक असेल, किंवा अगदी भारतीय उदाहरणंही घेता येतील, डिटेक्टीव्हना विक्षिप्त दाखवण्याकडे कल असतो. हा एक नियम असल्यासारखा भो भो मध्ये सुद्धा डिटेक्टीव्हला थोडं विक्षिप्त दाखवलं असावं, पण प्रशांत दामलेंच्या अभिनयाच्या पद्धतीमुळे व्यंकटेश भोंडेचं विक्षिप्त वागणं अतिरंजित होऊन जातं. काही विनोद, काही प्रसंग जे घुसडलेले वाटतात, ते टाळणं खूप गरजेचं होतं.

रेटिंग 100 पैकी 60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close