S M L

सिनेमांच्या शूटिंग शेड्यूलवर बिग बीच्या पोटदुखीचा परिणाम

13 ऑक्टोबर, मुंबई -अमिताभ बच्चन यांचं आजारपण हा नेहमीच चर्चेचा आणि सगळ्यांच्या काळजीचा विषय राहिला आहे. आता त्यांच्या प्रकृतीत तर चांगलीच सुधारणा आहे.असं डॉक्टरांनीच सांगितलं आहे, त्यामुळे चाहत्यांनी आणि मुख्य म्हणजे निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला असेल. त्यांच्यासाठी इंडस्ट्रीने एकूण 100 कोटी रूपयांची गंुतवणूक केली आहे. बिग बीच्या साध्या पोटदुखीमुळे फिल्म इंडस्ट्रीत चिंतेचं वातावरण तयार होतं आणि ते स्वाभाविकच आहे कारण बिग बी हा नुसता अभिनेता नाही तर एक ब्रँड आहे. अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा आहे 'तीन पत्ती'. तीन पत्ती हा सिनेमा आहे लीना यादवचा आणि त्याचं बजेट आहे पंचवीस कोटी रुपये. यात अमितजींबरोबर आहेत महेश मांजरेकर आणि माधवन. पस्तीस कोटी रुपये बजेट असलेल्या सुजय घोषच्या 'अल्लादीन' या सिनेमाचं शूटिंग तर संपलं आहे. पण अमिताभचा सहभाग असलेल्या एका गाण्याचं शूटिंग राहिलंय, जे याच महिन्यात शूट होणार होतं.. सुजीत सरकारच्या 'शूबाईट' सिनेमाचाही काही भाग शूट व्हायचा बाकी आहे, या सिनेमाचं बजेट आहे वीस कोटी रुपये. याशिवाय संजय लीला भन्सालीचा 'चेनाब गांधी' आणि चंद्रप्रकाश द्विवेदीचा 'कुणाल' हे बिगबजेट सिनेमे येत्या काही दिवसांत फ्लोअरवर जातायत. आता या सिनेमांच्या शूटिंग शेड्यूलवर बिग बीच्या पोटदुखीचा नक्कीच परिणाम होईल हे तर नक्की झालं आहे. ही बाब फक्त सिनेमांची नाही आहे तर नुकतीच बच्चन फॅमिली 'अनफरगेटेबल टूर'चा मोठा प्रवास करुन भारतात परतली होती. याच वर्ल्ड टूरचा दुसरा सीझन आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दल प्रचार करण्यासाठी लाईव्ह अर्थ इंडिया कॉन्सर्ट यांची तयारीही जोरात सुरू आहे. पण काही दिवस तरी अमिताभ रिहर्सलना जाऊ शकणार नाही. त्यामुळे वर्ल्ड टूर वाल्यांनाही चिंता लागून राहिली आहे.या वयातही हातात पाच-पाच सिनेमे, वर्ल्ड टूर, लाईव्ह कॉन्सर्ट... अमिताभचं इंडस्ट्रीतलं महत्त्व यावरूनच लक्षात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 04:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2008 04:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close