S M L

...तर बागवानवर कारवाई

9 जूनमिरज दंगलप्रकरणी मिरजचा माजी महापौर मैनुद्दीन बागवान दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे. बागवान जयंत पाटलांना भेटला तेव्हा त्याच्यावर वॉरंट होते का? याची चौकशी सुरू आहे. वॉरंट असेल तर पोलिसांनी अटक का केली नाही, याचीही चौकशी होईल असेही आर. आर. यांनी म्हटले आहे. आपण दोन दिवसांपूर्वी मैनुद्दीन बागवान याला भेटल्याची कबुली ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी काल 'आयबीएन-लोकमत'च्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात दिली होती. बागवानचा जमिनासाठी अर्जदरम्यान बागवान याने सांगली सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. बागवानच्या वकिलांनी हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. बागवानच्या अटक वॉरंटवरच त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. बागवानवर कुठलाही गुन्हा नसताना त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला कसा? असा युक्तीवाद त्याचे वकील श्रीकांत जाधव यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:25 PM IST

...तर बागवानवर कारवाई

9 जून

मिरज दंगलप्रकरणी मिरजचा माजी महापौर मैनुद्दीन बागवान दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे.

बागवान जयंत पाटलांना भेटला तेव्हा त्याच्यावर वॉरंट होते का? याची चौकशी सुरू आहे. वॉरंट असेल तर पोलिसांनी अटक का केली नाही, याचीही चौकशी होईल असेही आर. आर. यांनी म्हटले आहे.

आपण दोन दिवसांपूर्वी मैनुद्दीन बागवान याला भेटल्याची कबुली ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी काल 'आयबीएन-लोकमत'च्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात दिली होती.

बागवानचा जमिनासाठी अर्ज

दरम्यान बागवान याने सांगली सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

बागवानच्या वकिलांनी हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. बागवानच्या अटक वॉरंटवरच त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

बागवानवर कुठलाही गुन्हा नसताना त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला कसा? असा युक्तीवाद त्याचे वकील श्रीकांत जाधव यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close