S M L

स्त्री भ्रूण हत्येबाबत सायनाला खंत

22 ऑक्टोबरसायना नेहवाल सध्या बॅडमिंटनमधली भारताची पोस्टर गर्ल आहे. कोर्टवरची तिची कामगिरी ही कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा अशीच आहे. पण सायनाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या सख्ख्या आजीला आनंद तर नाहीच उलट दु:ख झाले होते. सायनाने एका न्यूजपेपरच्या कॉलममध्ये तिची ही कहाणी लिहिली आहे. सायनाच्या आजीला नातू हवा होता. पण सायनाच्या जन्मामुळे तिची निराशा झाली. आणि पहिला महिनाभर ती सायनाला पहायलाही गेली नाही, असं सायनाने या कॉलममध्ये लिहिले आहे. हरयाणा राज्यात मुलींबद्दल होणार्‍या भेदभावाच्या बातम्या हल्ली वारंवार मीडियात ऐकायला मिळतायत. त्यावरच बोलताना सायनाने आपला हा अनुभव सांगितला आहे. हरयाणा राज्यात दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 871 एवढे कमी आहे. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण राज्यात वाढत आहे. ही परिस्थिती विदारक असल्याचे सायनाने न्यूजपेपरमध्ये लिहिले आहे. त्याचवेळी अशा प्रतिकूल परिस्थितीत तिच्या बाजूने उभ्या राहिलेल्या तिच्या पालकांचेही तिने आभार मानले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 01:40 PM IST

स्त्री भ्रूण हत्येबाबत सायनाला खंत

22 ऑक्टोबर

सायना नेहवाल सध्या बॅडमिंटनमधली भारताची पोस्टर गर्ल आहे. कोर्टवरची तिची कामगिरी ही कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा अशीच आहे.

पण सायनाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या सख्ख्या आजीला आनंद तर नाहीच उलट दु:ख झाले होते. सायनाने एका न्यूजपेपरच्या कॉलममध्ये तिची ही कहाणी लिहिली आहे.

सायनाच्या आजीला नातू हवा होता. पण सायनाच्या जन्मामुळे तिची निराशा झाली. आणि पहिला महिनाभर ती सायनाला पहायलाही गेली नाही, असं सायनाने या कॉलममध्ये लिहिले आहे.

हरयाणा राज्यात मुलींबद्दल होणार्‍या भेदभावाच्या बातम्या हल्ली वारंवार मीडियात ऐकायला मिळतायत.

त्यावरच बोलताना सायनाने आपला हा अनुभव सांगितला आहे.

हरयाणा राज्यात दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 871 एवढे कमी आहे. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण राज्यात वाढत आहे.

ही परिस्थिती विदारक असल्याचे सायनाने न्यूजपेपरमध्ये लिहिले आहे.

त्याचवेळी अशा प्रतिकूल परिस्थितीत तिच्या बाजूने उभ्या राहिलेल्या तिच्या पालकांचेही तिने आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close