S M L

ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रात सचिनची दखल

22 डिसेंबरअजूनही अख्खं क्रिकेट जग सर डॉन ब्रॅडमन यांना खेळाच्या इतिहासातला सर्वोत्तम बॅट्समन मानते. त्यांचे 99.94 रन्सचे ऍव्हरेज गाठणं आता जवळ जवळ अशक्य आहे. क्रिकेटमध्ये त्यांच्या तोडीचा बॅट्समन नाही असे म्हटले जात होते. पण सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या टेस्ट सेंच्युरी नंतर सचिन आणि ब्रॅडमन यांची तुलना करण्याचा मोह ऑस्ट्रेलियातला एक न्यूजपेपर सिडनी मॉर्निंग हेराल्डलाही आवरला नाही. आणि त्यांनी आपल्या वाचकांनाच याविषयी आपली मतं विचारली. सचिन श्रेष्ठ की ब्रॅडमन असा रोखठोक सवाल होता. आणि गंमत म्हणजे खुद्द ऑस्ट्रेलियातल्या फॅन्सनी या पोलमध्ये सचिनला झुकते माप दिले. 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलमध्ये आपले मत नोंदवले. आणि यातल्या 67 टक्के लोकांनी सचिनला पसंती दिली. तर 33 टक्के लोकांना अजूनही ब्रॅडमन सर्वोत्तम वाटतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 11:24 AM IST

ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रात सचिनची दखल

22 डिसेंबर

अजूनही अख्खं क्रिकेट जग सर डॉन ब्रॅडमन यांना खेळाच्या इतिहासातला सर्वोत्तम बॅट्समन मानते. त्यांचे 99.94 रन्सचे ऍव्हरेज गाठणं आता जवळ जवळ अशक्य आहे. क्रिकेटमध्ये त्यांच्या तोडीचा बॅट्समन नाही असे म्हटले जात होते. पण सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या टेस्ट सेंच्युरी नंतर सचिन आणि ब्रॅडमन यांची तुलना करण्याचा मोह ऑस्ट्रेलियातला एक न्यूजपेपर सिडनी मॉर्निंग हेराल्डलाही आवरला नाही. आणि त्यांनी आपल्या वाचकांनाच याविषयी आपली मतं विचारली. सचिन श्रेष्ठ की ब्रॅडमन असा रोखठोक सवाल होता. आणि गंमत म्हणजे खुद्द ऑस्ट्रेलियातल्या फॅन्सनी या पोलमध्ये सचिनला झुकते माप दिले. 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलमध्ये आपले मत नोंदवले. आणि यातल्या 67 टक्के लोकांनी सचिनला पसंती दिली. तर 33 टक्के लोकांना अजूनही ब्रॅडमन सर्वोत्तम वाटतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close