S M L

पेड न्यूज प्रकरणी निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता

10 फेब्रुवारीमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या पेड न्यूज प्रकरणाच्या सुनावणीस सुरुवात झाली आहे.आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी आहे.अभिषेक मनू सिंघवी हे निवडणूक आयोगापुढ चव्हाण यांची बाजू मांडताहेत. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींदरम्यान अशोक चव्हाण यांनी अनेक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. पण त्यांचा खर्च मात्र निवडणूक आयोगाकडे दिला नव्हता असं याचिकाकर्ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे तर या जाहिराती नसून बातम्याच होत्या असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे. पेड न्यूज प्रकरणाच्या निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पेड न्यूज प्रकरणाची गंभीर दखल मुख्य निवडणूक आयुक्त एस . वाय. कुरेशी तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 01:00 PM IST

पेड न्यूज प्रकरणी निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता

10 फेब्रुवारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या पेड न्यूज प्रकरणाच्या सुनावणीस सुरुवात झाली आहे.आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी आहे.अभिषेक मनू सिंघवी हे निवडणूक आयोगापुढ चव्हाण यांची बाजू मांडताहेत. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींदरम्यान अशोक चव्हाण यांनी अनेक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. पण त्यांचा खर्च मात्र निवडणूक आयोगाकडे दिला नव्हता असं याचिकाकर्ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे तर या जाहिराती नसून बातम्याच होत्या असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे. पेड न्यूज प्रकरणाच्या निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पेड न्यूज प्रकरणाची गंभीर दखल मुख्य निवडणूक आयुक्त एस . वाय. कुरेशी तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close