S M L

आदरांजली बी.आर. चोप्रांना

6 नोव्हेंबर, मुंबई बी.आर. फिल्मसचे सर्वेसर्वा बी.आर. चोप्रा विशेष ओळखले जातात, ते 'महाभारत' या पुराणग्रंथाला टीव्हीवर आणण्यासाठी. प्रदीर्घ आजारानंतर त्यांचं मुंबईत निधन झालं. ज्येष्ठ निर्माते बलदेव राज चोप्रा इंडस्ट्रीत ओळखले जातात ते बी.आर. चोप्रा म्हणून. 'नया दौर', 'निकाह' सारख्या वेगळ्या आणि गाजलेल्या सिनेमांची निर्मिती तसंच महाभारत या टेलिव्हिजन मालिकेची निर्मिती त्यांनी केली. लुधियानामध्ये 1914 साली जन्मलेल्या बी. आर.जींचं शिक्षण लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये झालं. 1947च्या फाळणीनंतर ते मुंबईत आले. यानंतर 1955मध्ये बी आर फिल्मस नावानं त्यांनी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. पन्नास ते साठच्या दशकात 'नया दौर', 'गुमराह', 'हमराज'सारख्या हिट सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलं. बी.आर. फिल्मसच्या बॅनर खाली 'धुल का फूल', 'वक्त'आणि 'इत्तफाक'सारख्या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. जे त्यांचा लहान भाऊ यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केले होते.1988मध्ये 'महाभारत' या त्यांच्या पहिल्यावहिल्या मेगा मालिकेला भारतात 96 टक्क्यांहूनही अधिक प्रेक्षकसंख्या होती. ज्यामुळे या मालिकेची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची मुख्य भूमिका असलेल्या बागबान या सिनेमाच्या कथेचं लेखनही खुद्द बी.आर.जींनी केलं होतं, या सिनेमातली भूमिका त्यांना दिलीप कुमारना द्यायची होती. आपल्या कारकीर्दीत चोप्रा यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 1998मध्ये दादासाहेब फाळके हा सर्वोत्तम पुरस्कारही मिळाला. आज ते हयात नसतानाही संपूर्ण इंडस्ट्री मात्र त्यांना सदैव लक्षात ठेवेल ते हिंदी सिनेमातला एक सुवर्णकाळ म्हणूनच.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 02:16 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close