S M L

लादेन ठार झाल्याची 'ब्रेकिंग न्यूज' सर्वप्रथम ट्विटरवरून

03 मेओसामा बिन लादेन मारला गेल्याची बातमी ही या दशकातील सगळ्यात मोठी बातमी. मात्र ही बातमी कुठल्याही न्यूजचॅनलने दिली नाही तर ती पाकिस्तानातील एका कॉम्प्यूटर प्रोफेशनलनं ट्विटरवरून ब्रेक केली. शोएब अथार असं या व्यक्तीचं नाव आहे. अबोटाबादवर रात्री एक वाजता हेलिकॉप्टर्स गर-गरणं ही क्वचित घडणारी घटना होती असं त्यांनी सर्वात आधी ट्विट केलं. 'ReallyVirtual' या नावाने तो ट्विट करतो. त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्यानी म्हटलंय अबोटाबादमध्ये बॉम्बस्फोट होत आहे. मी आशा करतो की सगळे सुखरुप आहेत. आणि काही वेळानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की ,'आता मला कळतंय की ओसामावर सुरु असलेल्या कारवाईवर मी लाईव्ह ब्लॉग देत होतो.' शोयब अतहरचे केवळ 24 तासात 82 हजार फॉलोअर्स झाले होते. आणि तो एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 09:09 AM IST

लादेन ठार झाल्याची 'ब्रेकिंग न्यूज' सर्वप्रथम ट्विटरवरून

03 मे

ओसामा बिन लादेन मारला गेल्याची बातमी ही या दशकातील सगळ्यात मोठी बातमी. मात्र ही बातमी कुठल्याही न्यूजचॅनलने दिली नाही तर ती पाकिस्तानातील एका कॉम्प्यूटर प्रोफेशनलनं ट्विटरवरून ब्रेक केली. शोएब अथार असं या व्यक्तीचं नाव आहे.

अबोटाबादवर रात्री एक वाजता हेलिकॉप्टर्स गर-गरणं ही क्वचित घडणारी घटना होती असं त्यांनी सर्वात आधी ट्विट केलं. 'ReallyVirtual' या नावाने तो ट्विट करतो. त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्यानी म्हटलंय अबोटाबादमध्ये बॉम्बस्फोट होत आहे. मी आशा करतो की सगळे सुखरुप आहेत. आणि काही वेळानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की ,'आता मला कळतंय की ओसामावर सुरु असलेल्या कारवाईवर मी लाईव्ह ब्लॉग देत होतो.' शोयब अतहरचे केवळ 24 तासात 82 हजार फॉलोअर्स झाले होते. आणि तो एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close