S M L

'बाबू बँड बाजा'च्या दिग्दर्शकानी कथा चोरली !

प्रशांत कोरटकर, वर्धा 01 जूननुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाबू बँन्ड बाजा चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. मातंग समाजातील चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे. पण आता हा सिनेमा वादात अडकला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी ही कथा वर्धा जिल्ह्यातील अशोक बुरबुरे यांच्या आग्टं या नाटकातून घेतली असल्याचा आरोप बुरबुरे यांनी केला आहे. हिंगणघाटमध्ये शाळेत शिक्षक असलेले लेखक अशोक बुरबुरे यांनी दहा वर्षापूर्वी आग्टं नावाचं नाटक लिहिलं. मातंग समाजावर आधारित या नाटकात मातंग समाजातील एका मुलांची कथा मांडली आहे. ज्यात मातंग समाजाच्या मुलाला शिक्षणाची आवड असते पण परिस्थितीमुळे त्याला शिक्षण टाकून बँड वाजवण्यासाठी वडीलांसोबत जावं लागतं. ही कथा ऐकून दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी अशोक बुरबुरे यांची अनेकदा भेट घेतली आणि या वर सिनेमा काढू असा विश्वास दाखवला यासाठी बुरबुरे यांनी पिंजानी यांना बर्‍याच गोष्टी उपलब्ध करून दिल्याचा दावा बुरबुरे यांनी केला आहे. आग्टं या नाटकाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. राजेश पिंजानी यांनी अशोक बुरबुरे यांच्याकडे त्यांच्या नाटकावर सिनेमा तयार करण्यासाठी परवानगी मागितली होती आणि संबंधीत कथेत बदल करू नये असा बुरबुरे यांचा आग्रह होता पण त्यांनंतर पिंजानी यांनी कुठलाही संपर्क केला नाही. पिंजानी यांनी चक्क आपली कथा चोरली असल्याचा थेट आरोप बुरबुरे यांनी केला आहे. यावर दिग्दर्शक आणि निर्माता राजेश पिंजानी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या आधी ही अनेकदा गाणी तसेच गाण्याच्या चाली चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. पण यावेळी तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाची कथाच चोरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणार्‍या प्रतिभावंत कलाकारांची अशा पध्दतीनं कला कुणा दुसर्‍याच्या नावे प्रकाशात येत असेल तर स्थानिक कलेला वाव तरी कसा मिळणार ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 12:16 PM IST

'बाबू बँड बाजा'च्या दिग्दर्शकानी कथा चोरली !

प्रशांत कोरटकर, वर्धा

01 जून

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाबू बँन्ड बाजा चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. मातंग समाजातील चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे. पण आता हा सिनेमा वादात अडकला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी ही कथा वर्धा जिल्ह्यातील अशोक बुरबुरे यांच्या आग्टं या नाटकातून घेतली असल्याचा आरोप बुरबुरे यांनी केला आहे.

हिंगणघाटमध्ये शाळेत शिक्षक असलेले लेखक अशोक बुरबुरे यांनी दहा वर्षापूर्वी आग्टं नावाचं नाटक लिहिलं. मातंग समाजावर आधारित या नाटकात मातंग समाजातील एका मुलांची कथा मांडली आहे.

ज्यात मातंग समाजाच्या मुलाला शिक्षणाची आवड असते पण परिस्थितीमुळे त्याला शिक्षण टाकून बँड वाजवण्यासाठी वडीलांसोबत जावं लागतं. ही कथा ऐकून दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी अशोक बुरबुरे यांची अनेकदा भेट घेतली आणि या वर सिनेमा काढू असा विश्वास दाखवला यासाठी बुरबुरे यांनी पिंजानी यांना बर्‍याच गोष्टी उपलब्ध करून दिल्याचा दावा बुरबुरे यांनी केला आहे.

आग्टं या नाटकाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. राजेश पिंजानी यांनी अशोक बुरबुरे यांच्याकडे त्यांच्या नाटकावर सिनेमा तयार करण्यासाठी परवानगी मागितली होती आणि संबंधीत कथेत बदल करू नये असा बुरबुरे यांचा आग्रह होता पण त्यांनंतर पिंजानी यांनी कुठलाही संपर्क केला नाही.

पिंजानी यांनी चक्क आपली कथा चोरली असल्याचा थेट आरोप बुरबुरे यांनी केला आहे. यावर दिग्दर्शक आणि निर्माता राजेश पिंजानी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या आधी ही अनेकदा गाणी तसेच गाण्याच्या चाली चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

पण यावेळी तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाची कथाच चोरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणार्‍या प्रतिभावंत कलाकारांची अशा पध्दतीनं कला कुणा दुसर्‍याच्या नावे प्रकाशात येत असेल तर स्थानिक कलेला वाव तरी कसा मिळणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close