S M L

राजकीय नेत्यांनी कलागुणांवर गदा आणू नये - बच्चन

10 ऑगस्टमी कोणते कपडे घालावे आणि काय बोलावे यावर राजकीय नेत्यांनी बंधनं का घालावीत आमच्यासारख्या कलाकारांच्या कलाविष्कारावर गदा आणू नका आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही समाजाविरोधात काहीही केलेलं नाही अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. काल छगन भूजबळ यांच्यासाठी प्रकाश झा यांनी आरक्षण सिनेमाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. सिनेमा पाहिल्यानंतर भूजबळ यांनी काही दृश्य आणि संवादावर आक्षेप घेतला. पण हे दृश्य संवाद जर वगळता आले तर आपला विरोध नसणार असं अशी सुचना भूजबळ यांनी केली होती. छगन भुजबळ यांच्या सेन्सॉरशिपमुळे झा यांनी आरक्षणमधील काही दृश्य वगळली आहेत. तर आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र या स्वयंघोषित सेन्सॉरशीपबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आरक्षण सिनेमा न पाहताच त्याला विरोध केला जातोय. असं अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे विरोध करणार्‍यांना प्रसिद्धी मिळत असल्यानेच ते विरोध करत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 11:41 AM IST

राजकीय नेत्यांनी कलागुणांवर गदा आणू नये - बच्चन

10 ऑगस्ट

मी कोणते कपडे घालावे आणि काय बोलावे यावर राजकीय नेत्यांनी बंधनं का घालावीत आमच्यासारख्या कलाकारांच्या कलाविष्कारावर गदा आणू नका आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही समाजाविरोधात काहीही केलेलं नाही अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली.

काल छगन भूजबळ यांच्यासाठी प्रकाश झा यांनी आरक्षण सिनेमाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. सिनेमा पाहिल्यानंतर भूजबळ यांनी काही दृश्य आणि संवादावर आक्षेप घेतला. पण हे दृश्य संवाद जर वगळता आले तर आपला विरोध नसणार असं अशी सुचना भूजबळ यांनी केली होती. छगन भुजबळ यांच्या सेन्सॉरशिपमुळे झा यांनी आरक्षणमधील काही दृश्य वगळली आहेत.

तर आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र या स्वयंघोषित सेन्सॉरशीपबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आरक्षण सिनेमा न पाहताच त्याला विरोध केला जातोय. असं अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे विरोध करणार्‍यांना प्रसिद्धी मिळत असल्यानेच ते विरोध करत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close