S M L

डॉ.मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार

03 नोव्हेंबरजागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ.मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते 5 नोव्हेंबरला मोहन आगाशे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 25 हजार रूपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनेते मोहन आगाशे यांना याआधी 1996 ला मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलंय. मोहन आगाशेंच्या जैत रे जैत ,सिंहासन,वळू ,विहीर तसेच हिंदीतल्या आक्रोश, भूमिका, अपहरण, अब तक छप्पन या सिनेमातील भुमिका खूप गाजल्या.. घाशीराम कोतवाल नाटकातील त्यांनी रंगवलेली नानासोहब ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सध्या त्यांची प्रमुख भुमिका असणारं काटकोन त्रिकोण हे नाटक रंगभूमीवर गाजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2011 09:29 AM IST

डॉ.मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार

03 नोव्हेंबर

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ.मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते 5 नोव्हेंबरला मोहन आगाशे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 25 हजार रूपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनेते मोहन आगाशे यांना याआधी 1996 ला मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलंय. मोहन आगाशेंच्या जैत रे जैत ,सिंहासन,वळू ,विहीर तसेच हिंदीतल्या आक्रोश, भूमिका, अपहरण, अब तक छप्पन या सिनेमातील भुमिका खूप गाजल्या.. घाशीराम कोतवाल नाटकातील त्यांनी रंगवलेली नानासोहब ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सध्या त्यांची प्रमुख भुमिका असणारं काटकोन त्रिकोण हे नाटक रंगभूमीवर गाजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2011 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close