S M L

'ऑक्सिजन ... जीव गुदमरतोय' प्रदर्शनाच्या वाटेवर

18 नोव्हेंबर, मुंबई रचना सकपाळमराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत. मराठीतल्या हिट सिनेमांच्या जंत्रीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'ऑक्सिजन ... जीव गुदमरतोय'. निर्माती नीता देवकर यांचा हा मराठी सिनेमा आहे. 'हिरवं कुंकू', 'शंभू माझा नवसा'चा हे दोन हिट सिनेमे दिल्यानंतर निर्मात्या नीता देवकर यांची 'ऑक्सिजन ... जीव गुदमरतोय' ही तिसरी कलाकृती आहे. 'ऑक्सिजन- जीव गुदमरतोय' मध्ये एका साध्या निष्पाप मुलीनं मन खंबीर करून समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध दिलेल्या लढ्याची कथा मांडली आहे. सिनेमात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, संदीप कुलकर्णी, चारूशीला साबळे-वाच्छानी अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. माझ्या दोन सिनेमांपेक्षा हाही सिनेमा लोकांना आवडेल, असं निर्माती नीता देवकर ठामपणे म्हणाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 01:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close