S M L

पेड न्यूज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

03 जानेवारीमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय भवितव्यसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अशोक चव्हाण यांना गेल्या सुनावणीच्यावेळी सुप्रीम कोर्टाने आपलं म्हणणं मांडायला सांगितलं होतं. निवडणुकीचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा हक्क निवडणूक आयोगाला आहे. असं हायकोर्टाने याबद्दलच्या निकालात म्हटलं होतं. त्यावर चव्हाण यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने आपलं याबद्दलचं म्हणणं गेल्या वेळी सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे. यावर अशोक चव्हाण यांचे वकील आज आपली बाजू मांडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 07:32 AM IST

पेड न्यूज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

03 जानेवारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय भवितव्यसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अशोक चव्हाण यांना गेल्या सुनावणीच्यावेळी सुप्रीम कोर्टाने आपलं म्हणणं मांडायला सांगितलं होतं. निवडणुकीचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा हक्क निवडणूक आयोगाला आहे. असं हायकोर्टाने याबद्दलच्या निकालात म्हटलं होतं. त्यावर चव्हाण यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने आपलं याबद्दलचं म्हणणं गेल्या वेळी सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे. यावर अशोक चव्हाण यांचे वकील आज आपली बाजू मांडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 07:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close