S M L

बंगारू लक्ष्मण यांना 4 वर्ष तुरूंगवास

28 एप्रिललाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना 4 वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. आज कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलेला आहे. सीबीआयनं जास्तीत जास्त शिक्षा करा अशी मागणी केलीय. तर बंगारु लक्ष्मण यांनी वय आणि तब्येतीचं कारण देत कमीत कमी शिक्षा करावी अशी विनंती कोर्टाला केली होती मात्र कोर्टाने आपला निर्णय देत बंगारू लक्ष्मण यांना 4 वर्षासाठी तुरूंगात पाठवले आहे. तर एक लाखांचा दंड ठोठवला आहे. काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. 2001 साली तहलका डॉट कॉम ने केलेल्या एका स्टिंग ऑपेरशनमध्ये बंगारू लक्ष्मण यांनी एक लाखांची लाच घेताना कैमेर्‍यात कैद केले होते. तहलकाने ही सीडी नंतर प्रसिध्द केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तब्बल 11 वर्षानंतर आज निकालाची सुनावणी झाली.तहलकाचं 'स्टिंग', बंगारूंचा भांडाफोड13 मार्च 2001 च्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओने भारतीय राजकारणात भूकंप घडवला. केंद्रात भाजपप्रणित आघाडीची सत्ता असताना.. त्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लाच घेताना या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला. तहलका या न्यूज वेबसाईटने हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयांची लाच घेताना दाखवण्यात आलं होतं. तब्बल 11 वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणी लक्ष्मण यांना दोषी ठरवलं. अखेर या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. नामुष्की ओढावलेल्या भाजपने मात्र, आपल्याच माजी अध्यक्षाला वाळीत टाकलं. गेल्या काही वर्षांत अनेक स्टिंग ऑपरेशन्स झाली असली. तरी बंगारू हे 'ऑपरेशन वेस्टएंड' नावाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले जाणारे पहिले मोठे नेते होते. - तहलकाचा रिपोर्टर शस्त्रास्त्र विक्रेता बनून बंगारूंना भेटला- रिपोर्टरने बंगारूंना भारत सरकारशी शस्त्रास्त्र डील करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली- त्यासाठी 1 लाख रुपये दिले आणि लक्ष्मण यांनी ते घेतले- 13 मार्चला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर लक्ष्मण आणि तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागाला- या प्रकरणाच्या तपासासाठी 2001 साली जस्टिस वेंकटस्वामी आयोगाची स्थापना झाली- 2003 मध्ये जस्टीस फूकन आयोगाकडे तपास सोपवण्यात आला- फूकन आयोगाने फर्नांडिस यांना क्लीन चिट दिली- 2004मध्ये तपास सीबीआयला सोपवण्यात आला- सीबीआयनं गेल्या वर्षी लक्ष्मण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 09:17 AM IST

बंगारू लक्ष्मण यांना 4 वर्ष तुरूंगवास

28 एप्रिल

लाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना 4 वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. आज कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलेला आहे. सीबीआयनं जास्तीत जास्त शिक्षा करा अशी मागणी केलीय. तर बंगारु लक्ष्मण यांनी वय आणि तब्येतीचं कारण देत कमीत कमी शिक्षा करावी अशी विनंती कोर्टाला केली होती मात्र कोर्टाने आपला निर्णय देत बंगारू लक्ष्मण यांना 4 वर्षासाठी तुरूंगात पाठवले आहे. तर एक लाखांचा दंड ठोठवला आहे. काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. 2001 साली तहलका डॉट कॉम ने केलेल्या एका स्टिंग ऑपेरशनमध्ये बंगारू लक्ष्मण यांनी एक लाखांची लाच घेताना कैमेर्‍यात कैद केले होते. तहलकाने ही सीडी नंतर प्रसिध्द केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तब्बल 11 वर्षानंतर आज निकालाची सुनावणी झाली.

तहलकाचं 'स्टिंग', बंगारूंचा भांडाफोड

13 मार्च 2001 च्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओने भारतीय राजकारणात भूकंप घडवला. केंद्रात भाजपप्रणित आघाडीची सत्ता असताना.. त्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लाच घेताना या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला. तहलका या न्यूज वेबसाईटने हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयांची लाच घेताना दाखवण्यात आलं होतं. तब्बल 11 वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणी लक्ष्मण यांना दोषी ठरवलं. अखेर या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. नामुष्की ओढावलेल्या भाजपने मात्र, आपल्याच माजी अध्यक्षाला वाळीत टाकलं. गेल्या काही वर्षांत अनेक स्टिंग ऑपरेशन्स झाली असली. तरी बंगारू हे 'ऑपरेशन वेस्टएंड' नावाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले जाणारे पहिले मोठे नेते होते. - तहलकाचा रिपोर्टर शस्त्रास्त्र विक्रेता बनून बंगारूंना भेटला- रिपोर्टरने बंगारूंना भारत सरकारशी शस्त्रास्त्र डील करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली- त्यासाठी 1 लाख रुपये दिले आणि लक्ष्मण यांनी ते घेतले- 13 मार्चला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर लक्ष्मण आणि तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागाला- या प्रकरणाच्या तपासासाठी 2001 साली जस्टिस वेंकटस्वामी आयोगाची स्थापना झाली- 2003 मध्ये जस्टीस फूकन आयोगाकडे तपास सोपवण्यात आला- फूकन आयोगाने फर्नांडिस यांना क्लीन चिट दिली- 2004मध्ये तपास सीबीआयला सोपवण्यात आला- सीबीआयनं गेल्या वर्षी लक्ष्मण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 09:17 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close