S M L

..म्हणून ऍम्बेसेडर होऊ शकले नाही - माधुरी

21 जुलैमला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. मला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ब्रँड ऍम्बेसेडर होण्यासाठी संपर्क साधला होता पण त्यांच्यातच एकवाक्यता नसल्यामुळे मी महाराष्ट्राची ब्रँड ऍम्बेसेडर होऊ शकली नाही असा खुलासा माधुरी दीक्षितने केला. आज माधुरी यासंदर्भात टिवटरवरुन पर्यटन खात्यांच्या अधिकार्‍यांवर खापरं फोडलं.धक-धक गर्ल माधुरी दीक्षित अमेरिकेतून परतल्यानंतर बॉलिवूडकरांसह तिच्या तमाम चाहत्यांना मोठा आनंद झाला. अशातच महाराष्ट्र पर्यटनाला हातभार लागावा यासाठी ब्रँड ऍम्बेसडेरची शोधाशोध सुरु होती. आपला सर्वांचा लाडका क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला याबद्दल मागणी घालण्यात आली पण सचिनने काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे पर्यटन खात्याने माधुरीकडे गळ घातली. पण माधुरीने 12 कोटी रुपयांची मागणी केल्यामुळे पर्यटन खाते माघारी फिरले. महाराष्ट्राची कन्या असं काही मागू शकते यावर अजित पवारांनी टीका केली होती. पण आज या प्रकरणावर इतक्यादिवसांपासून दूर असलेल्या माधुरीने नवा खुलासा केला आहे. मी महाराष्ट्राची आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रीयन असण्याचा सार्थ अभिमान आहे. जो सगळ्यांना आहे. मला ब्रँड ऍम्बेसेडर व्हायचं होतं. मला याबद्दल पर्यटन खात्यांच्या अधिकार्‍यांनी तशी माहितीही दिली होती. मी त्यासाठी तयार होते. पण त्यांचातच प्रचंड गोंधळ होता. त्यांनी ऐकले ऐक आणि त्यातून दुसराच अर्थ काढला. यामुळे अजित पवार यांनी चुकीची माहिती दिली गेली. या चुकीच्या माहितीमुळे माझी विनाकारण बदनाम झाली. ही खूप शर्मेची गोष्ट आहे एका माणसाच्या चुकीमुळे मला याचा त्रास सहन करावा लागला असा खुलासा माधुरीने केला आहे. तसेच मी डान्स ऍकडमी सुरु करणार आहे हे खरं आहे. पण यासाठी मी शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पक्षाकडे जागा मागितली नाही असंही माधुरींने सांगितलं. एकंदरीच 'अंधेर नगरी चौपट राजा' असाच काहीसा कारभार झाला. माधुरींचं म्हणणं खरं असेल तर पर्यटन खात्याने चुकीची माहिती का दिली ? अधिकार्‍याची खरंच यात चुकी होती का ? जर असं असेल तर यावर अजित पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.काय म्हटलं माधुरीने टिवटवर- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनसाठी ऍम्बेसेडर होण्यासाठी विचारलं होतं. माझी सहमती होती. पण त्यांचे आपआपसात मतभेद होते- अखेर, याविषयी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) मी. पवारांना काही कळवलेले नाही- स्वत:ची चूक असताना उलट त्यांनीच मला डावललं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे- मी कोणत्याही कारणासाठी शिवसेना किंवा अन्य राजकीय पक्षाकडे जमीन मागितली नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 03:30 PM IST

..म्हणून ऍम्बेसेडर होऊ शकले नाही - माधुरी

21 जुलै

मला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. मला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ब्रँड ऍम्बेसेडर होण्यासाठी संपर्क साधला होता पण त्यांच्यातच एकवाक्यता नसल्यामुळे मी महाराष्ट्राची ब्रँड ऍम्बेसेडर होऊ शकली नाही असा खुलासा माधुरी दीक्षितने केला. आज माधुरी यासंदर्भात टिवटरवरुन पर्यटन खात्यांच्या अधिकार्‍यांवर खापरं फोडलं.

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित अमेरिकेतून परतल्यानंतर बॉलिवूडकरांसह तिच्या तमाम चाहत्यांना मोठा आनंद झाला. अशातच महाराष्ट्र पर्यटनाला हातभार लागावा यासाठी ब्रँड ऍम्बेसडेरची शोधाशोध सुरु होती. आपला सर्वांचा लाडका क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला याबद्दल मागणी घालण्यात आली पण सचिनने काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे पर्यटन खात्याने माधुरीकडे गळ घातली. पण माधुरीने 12 कोटी रुपयांची मागणी केल्यामुळे पर्यटन खाते माघारी फिरले. महाराष्ट्राची कन्या असं काही मागू शकते यावर अजित पवारांनी टीका केली होती. पण आज या प्रकरणावर इतक्यादिवसांपासून दूर असलेल्या माधुरीने नवा खुलासा केला आहे.

मी महाराष्ट्राची आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रीयन असण्याचा सार्थ अभिमान आहे. जो सगळ्यांना आहे. मला ब्रँड ऍम्बेसेडर व्हायचं होतं. मला याबद्दल पर्यटन खात्यांच्या अधिकार्‍यांनी तशी माहितीही दिली होती. मी त्यासाठी तयार होते. पण त्यांचातच प्रचंड गोंधळ होता. त्यांनी ऐकले ऐक आणि त्यातून दुसराच अर्थ काढला. यामुळे अजित पवार यांनी चुकीची माहिती दिली गेली. या चुकीच्या माहितीमुळे माझी विनाकारण बदनाम झाली. ही खूप शर्मेची गोष्ट आहे एका माणसाच्या चुकीमुळे मला याचा त्रास सहन करावा लागला असा खुलासा माधुरीने केला आहे.

तसेच मी डान्स ऍकडमी सुरु करणार आहे हे खरं आहे. पण यासाठी मी शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पक्षाकडे जागा मागितली नाही असंही माधुरींने सांगितलं. एकंदरीच 'अंधेर नगरी चौपट राजा' असाच काहीसा कारभार झाला. माधुरींचं म्हणणं खरं असेल तर पर्यटन खात्याने चुकीची माहिती का दिली ? अधिकार्‍याची खरंच यात चुकी होती का ? जर असं असेल तर यावर अजित पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काय म्हटलं माधुरीने टिवटवर- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनसाठी ऍम्बेसेडर होण्यासाठी विचारलं होतं. माझी सहमती होती. पण त्यांचे आपआपसात मतभेद होते

- अखेर, याविषयी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) मी. पवारांना काही कळवलेले नाही

- स्वत:ची चूक असताना उलट त्यांनीच मला डावललं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे

- मी कोणत्याही कारणासाठी शिवसेना किंवा अन्य राजकीय पक्षाकडे जमीन मागितली नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close