S M L

झी न्यूजच्या संपादकांना अटक

27 नोव्हेंबरझी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना दिल्ली क्राईम ब्रांचनं अटक केलीय. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी या दोघांवर बातमी दडपण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्याची सीडी खरी असल्याचं फॉरेन्सिक टेस्टमध्ये स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांना उद्या साकेत कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोळसा घोटाळ्याची बातमी लावू नये, यासाठी झी न्यूजनं आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप जिंदल यांनी केला होता. याचा पुराव म्हणून त्यांनी या खंडणी प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओच जगजाहीर केला होता. या व्हिडिओमध्ये झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया जिंदल यांच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण झी न्यूजनं जिंदल यांनीच आपल्याला लाच देऊ केली, असं स्पष्टिकरण दिलं. जिंदल यांनी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादर समीर अहलुवालिया यांच्यासोबत 13, 17 आणि 19 सप्टेंबरला आपल्या कंपनीच्या लोकांसोबत बैठक झाली होती या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याचे स्टिंग ऑपेरशन करण्यात आलं होतं. तसेच हे स्टिंग थांबवण्यासाठी 100 कोटींची मागणी केली जर हे स्टिंग थांबवले नाही तर बदनामी करू अशी धमकीही झी न्यूजने दिली अशी माहिती जिंदल यांनी दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 05:31 PM IST

झी न्यूजच्या संपादकांना अटक

27 नोव्हेंबर

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना दिल्ली क्राईम ब्रांचनं अटक केलीय. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी या दोघांवर बातमी दडपण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्याची सीडी खरी असल्याचं फॉरेन्सिक टेस्टमध्ये स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांना उद्या साकेत कोर्टात हजर केलं जाणार आहे.

कोळसा घोटाळ्याची बातमी लावू नये, यासाठी झी न्यूजनं आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप जिंदल यांनी केला होता. याचा पुराव म्हणून त्यांनी या खंडणी प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओच जगजाहीर केला होता. या व्हिडिओमध्ये झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया जिंदल यांच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण झी न्यूजनं जिंदल यांनीच आपल्याला लाच देऊ केली, असं स्पष्टिकरण दिलं. जिंदल यांनी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादर समीर अहलुवालिया यांच्यासोबत 13, 17 आणि 19 सप्टेंबरला आपल्या कंपनीच्या लोकांसोबत बैठक झाली होती या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याचे स्टिंग ऑपेरशन करण्यात आलं होतं. तसेच हे स्टिंग थांबवण्यासाठी 100 कोटींची मागणी केली जर हे स्टिंग थांबवले नाही तर बदनामी करू अशी धमकीही झी न्यूजने दिली अशी माहिती जिंदल यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close