S M L

गप्पा जितेंद्र जोशी बरोबर

आज सलाम महाराष्ट्रमध्ये नाटक, सिरीयल्स, टीव्ही शोज आणि आता मराठी चित्रपटांतून मस्त वावरणारा अभिनेता जितेंद्र जोशी आपल्याबरोबर आहे. उत्तम अभिनेता, कवी, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या स्वरूपात तो रसिकांसमोर आला आणि प्रत्येक भूमिकेत वढाच लोकप्रिय झाला. नकळत सारे घडले, हम तो तेरे आशिक हैं मधल्या त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं आहे. सध्या तो झी मराठीवरच्या हास्यसम्राट या मालिकेचं सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या विनोदी स्वभावाचं दर्शन या कार्यक्रमातूनही घडलं.आत्ता दिवाळीत कितीही रोषणाई होत असली तरी जितूला मात्र लहानपणाची दिवाळी खूप प्रिय आहे. इलेक्ट्रिकल दिवाळी पेक्षा पण त्यांची दिवाळी त्याला जास्त आवडते. आपल्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींमध्ये तो हरवून गेला.लहानपणी आईने केलेला दिवाळीचा फराळ, किल्ले करण्यातली गंमत, नातेवाईकांची लगबग या सार्‍याविषयी तो भरभरून बोलला. ' आत्ता दिवाळीमध्ये सेलवर खूप मेसेजेस येतात. पण मावशीच्या पत्रातली गंमत त्यात नाही ', असंही त्याने आवर्जून सांगितलं.' दिवाळीचा आनंद प्रत्येकालाच असतो, पण किमान एक दिवा तरी प्रत्येकाने लावावा ' , असं तो म्हणाला.' अभिनय हा माझा श्वास आहे. अभिनयाचे सगळेच फॉर्म मी एंजॉय करतो. सूत्रसंचालनाच किंवा नाटक म्हणजे तो क्षण जगायचा असतो. चित्रपट म्हणजे लार्जर दॅन लाईफ आयुष्य जगायचं असतं. सगळ्यात जास्त उर्जा मला मिळते ती मित्रांकडून. जगात मैत्री ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. अर्थात माझ्या दृष्टीने मैत्रीला वय नसतं. याचबरोबर सगळ्या वयाच्या मैत्रिणीही मला आवडतात ' , अशी कोपरखळीही त्याने मारली.' कविता मी कधी ठरवून केल्या नाहीत. पण बर्‍याच गोष्टी सांगायच्या असतात. कधी त्रास होतो, कधी प्रेमात होतो, कधी उगाचच काहीतरी सांगावसं वाटलं म्हणून मी कविता लिहिल्या. ते माध्यम मला भावलं. त्यातून माझी अस्वस्थता बाहेर पडते. आजही मी अस्वस्थ असलो की खूप लांब चालत जातो, बांद्रा ते दादर चालतो, कधी मित्रांना त्रास देतो, आईशी गप्पा मारतो. त्यापेक्षा कविता करणं चांगलं नाही का ? ' असा मिश्कील प्रश्नंही तो विचारून गेला. या निमित्ताने काही कविताही त्याने प्रेक्षकांना ऐकवून दाखवल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 02:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2008 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close