S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • लंडनमध्ये रंगली मराठी कलाकारांची क्रिकेट मॅच !
  • लंडनमध्ये रंगली मराठी कलाकारांची क्रिकेट मॅच !

    Published On: Sep 25, 2011 01:59 PM IST | Updated On: Sep 25, 2011 01:59 PM IST

    25 सप्टेंबरमिफ्टा ऍवॉर्डची धूम लंडनला चांगलीच रंगली आहेत. सगळेच मराठी कलाकार लंडनच्या वातावरणात हरवून गेले आहेत. आणि त्यात आता भर पडली ती क्रिकेट मॅचची. महेश मांजरेकर बरोबर आणि लंडनमधील भारतीय यांच्यात क्रिकेटचा सामना चांगलाच रंगला. महेश मांजरेकरच्या टीममध्ये सुनील बर्वे, चंद्रकांत कुलकुर्णी, संजय जाधव, वैभव मांगले असे अनेक मराठी कलाकार क्रिकेटची मजा घेताना दिसले. यावेळी मराठी अभिनेत्री सगळ्यांनाच चिअर्स करत होत्या. लंडनकरांच्या टीमलाही आपल्या स्टार्सनीही मदत केली. या तगड्या मॅचचा विजय महेश मांजरेकर टीमच्या पारड्यात पडला. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या मिफ्टा क्रिकेट मॅचची आठवण अनेकांना आली. याही वेळी लंडनमध्ये क्रिकेट मॅचला उदंड प्रतिसाद मिळाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close