S M L
  • 'बॉन्ड'ची 'ढिश्युम-ढिश्युम' आणखी 5 सिनेमात

    Published On: Dec 21, 2011 04:16 PM IST | Updated On: Dec 21, 2011 04:16 PM IST

    21 डिसेंबरपाच बॉण्ड फिल्म्समध्ये काम करण्यासाठी डॅनियल क्रेगला ऑफर देण्यात आली आहे. 21 व्या बॉन्ड पटामधून डॅनियल क्रेग हा अभिनेता म्हणून पहिल्यांदा जेम्स बॉण्ड बनून 007च्या सीरीजमध्ये झळकला. 2005मध्ये आलेल्या कॅसिनो रोयाल या बॅण्डपटाने जेम्स बॉण्डची लोकप्रियता तशीच कायम ठेवली. 2008 मध्ये आलेला 'क्वांटम ऑफ सोलास' हा सिनेमा देखील डॅनियल क्रेगसाठी मोठा हिट ठरला. जर ही ऑफर त्याने स्वीकारली तर तो आतापर्यंतचा जास्तीत जास्त बाँडपट अभिनेता ठरेल. स्काय फॉल हा 2012 मध्ये रिलीज होतोय. या बाँडपटातही डॅनियल आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close