S M L

पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता

15 डिसेंबर, पुणेपुण्यात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादनाने झाली. त्यांनी मंगलभैरव राग सादर केला. त्यानंतर पं.जसराज यांनी गायलेल्या शुद्धसारंग रागाला रसिकांनी भरभरून दाद दिली. संध्याकाळच्या सत्रात श्रीनिवास जोशी यांचं गायल झालं तर महोत्सवाचा समारोप प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाला. पं. भीमसेन जोशी आज पुन्हा उपस्थित रहाणार का? याचीच रसिकांना उत्सुकता लागून राहिली होती. सवाई गंधर्व महोत्सवात तिस-या सत्राच्या संध्याकाळची सुरुवात सुरवात उस्ताद अर्षद अली यांच्या गायनाने झाली. मधुप मुदगल यांचं गाणं सुरू असतानाच पं. भीमसेन जोशी यांच आगमन झालं. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांच्या मंडपातील उपस्थितीला रसिकांनी भरभरुन दाद दिली. यावेळी गणेश आणि कुमरेश बंधूनी व्हायोलीनची जुगलबंदी सादर केली. त्यांना साथ देत असतानाच नैवेली नारायनन आणि कृष्णा यांची घट्टम-मृदुगांची जुगलबंदीही चांगलीच रंगली. सत्राची अखेर झाली ती पंडित राजन आणि साजन यांच्या गायनाने. त्यांनी बागेश्री रागातील बंदिशी सादर केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2008 01:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2008 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close