S M L
  • नव्या वर्षात सिक्विल्स सिनेमांचा धमाका

    Published On: Jan 3, 2012 04:29 PM IST | Updated On: Jan 3, 2012 04:29 PM IST

    03 जानेवारी2011 मध्ये बॉलिवूडमध्ये सिक्विल्स बनवण्याचा ट्रेंड चालू झाला आणि आता 2012 मध्ये देखील हाच सिलसिला चालू राहील अशी चिन्ह दिसत आहे. बॉलिवूडचे मोठे सितारे बिग बजेट सिनेमातून झळकणार आहेत. तेव्हा यावेळचं बॉलिवूडचे बजेट 1500 करोड पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2012 च्या बॉक्स ऑफीसवर पहिल्या आठवड्यात तिकीट विंडोवर आहेत प्लेअर्स.अब्बास-मस्तान दिग्दर्शित या सिनेमात अभिषेक बच्चन,नील नितीन मुकेश,बॉबी देओल, बिपाशा बासू आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे या नव्या वर्षाची फिल्मी सुरवात एकदम धडाकेबाज ऍक्शनने होणार आहे. येत्या 6 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होत आहेत. आणि दुसर्‍या आठवड्यात बॉलिवूडच्या बॉक्सऑफीसवर धडकणार आहे चालीस चौरासी..हा पोलिसांची व्हॅनचा नंबर असून या गाडीत सवारी करणार आहेत नसरूद्दीन शहा, रवि किशन,के.के. मेनन आणि अतुल कुलकर्णी. हा एक विनोदी सिनेमा असून अतुल पहिल्यांदाच बलविंदर सिंग या विनोदी भूमिकेत आपल्या समोर येतोय. तर बॉलिवूडचं हे वर्ष आहे सिक्वलचं. मेगाबजेटचे सिनेमे रिलीज होत आहे. जवळजवळ 1500 कोटींचा हा खेळ आहे. हा सिलसिला सुरु होणार आहे जोनवारीमध्ये रिलीज होणार्‍या अग्निपथ पासून.. अजय-अतुलचं संगीत आणि ह्रतिक रोशन प्रियांका चोप्रा, संजय दत्तची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या सिनेमातून पहायला मिळेल. विशेष म्हणजे संजू बाबा 1993 साली आलेल्या खलनायक या सिनेमानंतर आता पुन्हा एकदा अग्निपथ या सिनेमातून खलनायकाची भूमिका साकारतोय. तसेच अजय-अतुलने संगीतबद्ध केलेली 'चिकनी चमेली' तर 2011 साली वर्ष सरता सरता आपल्या समोर आली आणि लोकप्रियही झाली. पण आता खरी उत्सुकता आहे ती 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या विजय दिनानाथ चौहानच्या पुनर्भेटीची..तर साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक सलमान खान आणि अजय देवगणला लकी ठरलेत. यावर्षी तेच लक आजमावून पाहणार आहे अक्षय कुमार. त्याचा रावडी राठोड हा सिनेमा तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. तसेच क्रिश 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई 2, राज 3, हाऊसफुल 2, क्या सुपर कूल है हम, जन्नत 2 आणि रेस 2 अशी सिक्वलची भलीमोठी लिस्ट आहे. पण सगळ्यांचे लक्ष लागलंय ते दबंग 2 कडे. त्यात अर्थातच सल्लूमियाँ आहेच आणि अरबाज खान सिनेमाचं दिग्दर्शन करेल. इदच्या दिवशीच हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. सलमान खान पहिल्यांदाच यशराज फिल्मचा सिनेमा करणार. एक था टायगर या यशराजच्या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करणारेय, तर कतरिना कैफही या सिनेमात आहे. शाहरूखने तर दिवाळीचा वीकेण्ड बुक करून ठेवला आहे. त्या सिनेमाचे दिग्दर्शन यश चोप्रा करणार आहे तर याही सिनेमात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आहे. आणि संगीत ए.आर. रेहमानचे आहे.आमीर खानचा तलाश हाही या वर्षीचा महत्त्वाचा सिनेमा. रीमा त्यागीचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा थ्रिलर आहे. करिना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका आहेत. 3 इडियट्सनंतर आमीरचा हा पहिलाच मोठा सिनेमा. रॉकस्टारनंतर रणबीर कपूर आता बर्फी घेऊन येतोय. प्रियांका चोप्रा, इलेना डिसुझा यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा अनुराग बासू दिग्दर्शित करतोय. सैफ अली खानचा एजंट विनोद एकदाचा 23 मार्चला रिलीज होतोय. श्रीराम राघवन सिनेमाचा दिग्दर्शक आहे. तर मधुर भांडारकरच्या हिरॉइन सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे. विद्या बालनं साकारलेल्या द डर्ची पिक्चरमधल्या भूमिकेपेक्षा करिना वेगळं काय करते याबद्दलच चर्चा आहे. आणि विद्याच्या फॅन्ससाठी सुजोय घोषचा कहानी आहेच. तर करण जोहरचा नवा सिनेमा स्टुडंट ऑफ द इयर वेगळा असू शकतो. शाहरूख-काजोलशिवायचा हा सिनेमा नव्या चेहर्‍यांना घेऊन बनणार आहे याशिवाय दिबाकर बॅनजीर्ंचा शांघाई, अनुराग कश्यपचा टु पार्टनर ऑफ वासिपूर . विशाल भारद्वाजचा मट्रू का बि जली का मन्डोला आणि विक्रमादिच्य मोटवानेच्या लुटेरा हेही सिनेमे या वर्षी आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close