S M L

बॉक्स ऑफिसवर ' रब दे...' ने मारली बाझी

17 डिसेंबर, मुंबई' रब ने बना दी जोडी ' सिनेमा ज्यांनी सिनेमा पाहिलाय आणि ज्यांनी सिनेमा नाही पाहिलाये , ते सगळेजण सध्या विचारतायत एकच प्रश्न, ' रब ने बना दी जोडी ' हिट झाला की फ्लॉप ? बहुतेक समीक्षकांना तरी सिनेमा आवडला नव्हता. तब्बल 1200 प्रीन्टसह ' रब ने बना दी जोडी ' सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाचं फर्स्ट डे फर्स्ट शोचं ओपनिंग जवळपास साठ टक्के होतं. शनिवार-रविवार म्हणजे वीकेन्ड या सिनेमासाठी चांगलाच गेला. वीकेन्डमध्ये या सिनेमाने 85 टक्के बिझनेस केला. वीकेन्डच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन सात कोटी रुपये होतं. यशराज फिल्म्सचा दावा आहे की पहिल्या वीकेन्डमध्ये या सिनेमाने साठ कोटी रुपयांचा बिझनेस केलाय आहे. समीक्षकांनी ' रब ने बना दी जोडी ' फारसा आवडला नव्हता. बहुतेक सिनेसमीक्षकांनी ' रबने...' ला दोन स्टार दिले होते. पण शाहरुखच्या फॅन्सनी सिनेमाला चांगला बिझनेस मिळवून दिलाय हेच आकडेवारीवरून दिसत आहे.बॉक्स ऑफिससाठी ही गुड न्यूजच म्हणायला हवी. परेश रावलचा महत्त्वांकाक्षी सिनेमा ' महारथी ' फ्लॉप ठरला आहे. रिलेशनशिपची रंगतदार चर्चा असलेला दिल कबड्डी हा सिनेमासुध्दा बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. आता ' रब ने बना दी 'चा यशाचा ट्रेंड ' गजनी ' टिकवून ठेवेल का ते बघायचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 12:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close