S M L

' वुमन इन इंडियन फिल्म ' पुस्तक प्रकाशित

20 डिसेंबर, मुंबईपिया हिंगोरानी ' वुमन इन इंडियन फिल्म ' नावाच्या 10 पुस्तकांची एक सिरीज लाँच करण्यात आली आहे. नुकतंच मुंबईत दिग्दर्शिका फराह खानने या पुस्तकांचं प्रकाशन केलं. या पुस्तकांच्या संपादिका नसरीन मुन्नी कबीर आहेत.स्मिता पाटील , माधुरी दिक्षीत, मुमताज, नुतन यांच्या सारख्या सिनेसृष्टीत असणार्‍या स्त्रियांचं आयुष्य, या क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि काही प्रसंग एकत्र करण्यात आले आहेत. शिवाय फराह खानबद्दलही या पुस्तकात मिळते. या A सिरीज मधल्या पुस्तकांत एकुण 10 स्त्रियांची माहिती आहे." मुन्नीने सांगितलं की एका पुस्तकासाठी तुझे 2-3 इंटरव्हु घ्यायचे आहेत. मला वाटलं की एखाद्या लंडनच्या मासिकासाठी हे असेल पण भारतात प्रकाशित होणारी ही पुस्तकं तिने मला दाखवली तेव्हा मी आश्चर्यचकितच झाले, " असं या दिग्दर्शिका फराह खान म्हणाली. भारतीय सिनेसृष्टीत स्त्रियांनी केलेल्या योगदान बद्दल यावेळी फराह खान भरभरून बोलत होती. "आजच्या अभिनेत्रींमध्ये भरपूर आत्मविश्वास आहे काय करायचं आहे हे त्यांना माहित असतं . पुर्वी शुटिंग दरम्यान त्या आईला सोबत आणायच्या पण आता त्या बोल्ड झाल्यात, जर बॉय फ्रेण्ड असेल तर ती गोष्ट त्या उघडपणे सांगतात. लपवालपवी करत नाहीत, " दिग्दर्शिका फराह खान म्हणाली. 599 रुपयांत ही पुस्तकांची सिरीज बाजारात उपलब्ध आहे ,सिनेमापलिकडे माहिती हवी असेल, तर नक्कीच ही पुस्तकं नक्कीच उपयोगी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 05:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close