S M L
  • शाहरूख राजकारणाचा बळी -भट्ट

    Published On: Jan 29, 2013 02:34 PM IST | Updated On: Jan 29, 2013 02:34 PM IST

    29 जानेवारीशाहरूख खानचा प्यादा म्हणून वापर केला जात आहे. त्यांने आपल्या खाजगी आयुष्यात येणार्‍या अनुभवाबद्दल सांगितलं होतं. अमेरिकेवर 9/11 दहशतवादी हल्ला झाला होता तेंव्हा शाहरूखची विमानतळावर खान आहे म्हणून त्याला अडवण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशी झाली होती. एवढेच नाही तर त्याचा 'माय नेम इज खान' हा सिनेमा आला होता तेंव्हा सुद्धा मोठा वाद झाला होता. या घटनातून एखादा माणूस प्रवास करतो तेंव्हा त्याने आलेल्या अनुभवाबद्दल मत मांडलं. मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यात शाहरूखचं काय चुकलं ? त्यांचं काहीही चुकलं नसताना सुद्धा तो राजकारणाचा बळी ठरतोय अशी खंत सिनेनिर्माते दिग्दर्शक महेश भट्ट यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close