S M L

सुयोगच्या नाटकात सुरेखा पुणेकर

22 डिसेंबर, मुंबईरचना सकपाळनेहमी वेगवेगळ्या विषयांची नाटकं ही सुयोगची खासियत आहे. यावेळी सुयोग 'काय बाई सांगू ? ' हे लोकनाट्य घेऊन येत आहे. या नाटकात सुरेखा पुणेकर मुख्य भूमिकेत आहेत. ' लावणी ' हा लोकसंगीताचा प्रकार ही खासियत असणा-या सुरेखा पुणेकर आता काय बाई सांगू ? या नाटकात आपल्या अभिनयाच्या नख-याची अदा दाखवण्यास सज्ज झाल्या आहेत. 20 वर्षांपूर्वी मधू कांबिकरांना घेऊन ' सुयोग ' या संस्थेनं ' कशी मी राहू कशी ' हे लोकनाट्य रंगभूमीवर आणलं होतं. " ' काय बाई सांगू ? ' मध्ये वेडंवाकडं इंग्रजी बोलणारी एक गवळण आहे. ती भूमिका मी करत आहे. तिच्या इंग्रजी बोलण्यातून जो हास्य कल्लोळ होतो तो या नाटकात आहे, " अशी माहिती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी दिली. सुरेखा पुणेकरांचा करिष्मा डोळ्यांसमोर असल्यानं त्यांना घेऊनच नाटक करण्याची सुधीर भटांची इच्छा या नाटकामुळे पूर्ण होणार आहे. " सुयोगतर्फे लोकनाट्य साकारण्याची कल्पना डोक्यात सुरेखा पुणेकरांमुळे आली. तिचा करिष्मा माझ्या डोळ्यासमोर होताच. तिला विनोदाचा सेन्सही उत्तम आहे. मी काही विनोद केला की ती मला नेहमी बंपर काढून द्यायची. तिचा बोलणारा चेहरापाहून मी ठरवलं की तिला कधीतरी नाटकात घ्यायला पाहिजे. त्यात तिचीही नाटकातून काम करण्याची इच्छा होती," असं सुधीर भट म्हणाले. नाट्य आणि नृत्याचा अनोखा मेळ, वेगळी डायलॉगबाजी या सर्व गोष्टी दिग्दर्शकानेही लीलया सांभाळल्या आहेत. " हे नाटक बसवताना कोणतीही बंधनं नाहीत. यात ढोकलकीवाले, प्रेक्षक यांच्याशी सहज संवाद साधला आहे, " अशी माहिती दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिली आहे. 'काय बाई सांगू ? ' या नाटकाचा शुभारंभ येत्या 30 डिसेंबरला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2008 10:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2008 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close