S M L

संजय दत्तला शरण येण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत

17 एप्रिल1993 साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. संजयनं केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने त्याला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. संजयनं सहा महिन्यांची मुदत मागितली होती. संजयनं कोणतेही कायदेशीर मुद्दे उपस्थित केले नव्हते, तर केवळ दया अर्ज केला होता. त्यामुळं सिनेमांचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला ही मुदत देण्यात आली. संजयच्या चित्रपटांवर प्रचंड पैसा गुंतलेला आहे. मात्र, हा युक्तीवाद तकलादू आहे, निर्मात्यांना या खटल्याची माहिती असायला हवी होती असं मत कोर्टाने यावेळी नोंदवलं. बॉम्बस्फोटप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत संजय दत्त दोषी ठरवण्यात आलं असून त्याला पाच वर्षांचा तुरूगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजयने या अगोदर 18 महिन्याची तुरूंगवासाची शिक्षा भोगली आहे. त्याला 19 तारखेला शरण येण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण आज सुप्रीम कोर्टाने त्याला दिलासा देत महिन्याभराची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी झैबुन्निसासह इतर तीन दोषींची याचिका सोमवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. संजयला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का, असा प्रश्न झैबुन्निसाच्या मुलीनं विचारला. पण, दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत असं स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलंय. संजयचे अपूर्ण सिनेमे- संजय दत्तवर निर्मात्यांनी 300 ते 350 कोटी रुपये लावलेत- दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांचा 'पोलिसगिरी' सिनेमा - अपूर्वा लाखिया दिग्दर्शित अमिताभच्या जंजीर सिनेमाचा रिमेकमध्ये ही संजय काम करतोय- धर्मा प्रोडक्शनचा 'उंगली' सिनेमाचंही शूटिंग पूर्ण व्हायचंय- राज कुमार हिरानीच्या 'पीके' सिनेमात संजयचा गेस्ट अपिअरंस आहे. त्याचंही शूटिंग पूर्ण व्हायचंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:31 PM IST

संजय दत्तला शरण येण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत

17 एप्रिल

1993 साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. संजयनं केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने त्याला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. संजयनं सहा महिन्यांची मुदत मागितली होती. संजयनं कोणतेही कायदेशीर मुद्दे उपस्थित केले नव्हते, तर केवळ दया अर्ज केला होता. त्यामुळं सिनेमांचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला ही मुदत देण्यात आली.

संजयच्या चित्रपटांवर प्रचंड पैसा गुंतलेला आहे. मात्र, हा युक्तीवाद तकलादू आहे, निर्मात्यांना या खटल्याची माहिती असायला हवी होती असं मत कोर्टाने यावेळी नोंदवलं. बॉम्बस्फोटप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत संजय दत्त दोषी ठरवण्यात आलं असून त्याला पाच वर्षांचा तुरूगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजयने या अगोदर 18 महिन्याची तुरूंगवासाची शिक्षा भोगली आहे. त्याला 19 तारखेला शरण येण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण आज सुप्रीम कोर्टाने त्याला दिलासा देत महिन्याभराची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी झैबुन्निसासह इतर तीन दोषींची याचिका सोमवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. संजयला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का, असा प्रश्न झैबुन्निसाच्या मुलीनं विचारला. पण, दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत असं स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलंय.

संजयचे अपूर्ण सिनेमे- संजय दत्तवर निर्मात्यांनी 300 ते 350 कोटी रुपये लावलेत- दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांचा 'पोलिसगिरी' सिनेमा - अपूर्वा लाखिया दिग्दर्शित अमिताभच्या जंजीर सिनेमाचा रिमेकमध्ये ही संजय काम करतोय- धर्मा प्रोडक्शनचा 'उंगली' सिनेमाचंही शूटिंग पूर्ण व्हायचंय- राज कुमार हिरानीच्या 'पीके' सिनेमात संजयचा गेस्ट अपिअरंस आहे. त्याचंही शूटिंग पूर्ण व्हायचंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2013 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close