S M L

संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

22 एप्रिल1993 बॉंम्बस्फोट प्रकरणी खलनायक ठरलेल्या अभिनेता संजय दत्तच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. निर्माता शकील नूरानी यांनी संजय दत्तविरोधात पैसे घेऊनही चित्रपट पूर्ण न केल्याची याचिका सेशन्स कोर्टात दाखल केली होती. संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. निर्माता शकील नुरानी हे 'जान की बाजी' हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात काम करण्यासाठी संजय दत्तने तयार दाखवली होती आणि यासाठी 50 लाख रुपये अडव्हान्स घेतले होते. मात्र पैसे भेटल्यानंतर संजय दत्तने काम करण्यास नकार दिला. नुरानी यांनी अनेक वेळा विनंती करूनही संजय दत्त काम करण्यास नकार दिला. या प्रकरणी अंडरवर्ल्डची लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहे अशी तक्रार निर्माता नुरानी यांनी केली होती. या प्रकरणी संजय दत्त विरोधात नुरानी यांनी याचिका दाखल केली. अंधेरी कोर्टाने या प्रकरणी संजय दत्तला समन्स बजावली होती. मात्र तो कोर्टात हजर झाला नाही. अखेर आज अंधेरी कोर्टाने संजय दत्तला अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मागिल महिन्यात 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात त्याला चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा नुरानी याची फसवणूक प्रकरणी संजय दत्तचा पाय आणखी खोलात गेलाय. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:21 PM IST

संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

22 एप्रिल

1993 बॉंम्बस्फोट प्रकरणी खलनायक ठरलेल्या अभिनेता संजय दत्तच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. निर्माता शकील नूरानी यांनी संजय दत्तविरोधात पैसे घेऊनही चित्रपट पूर्ण न केल्याची याचिका सेशन्स कोर्टात दाखल केली होती. संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.

निर्माता शकील नुरानी हे 'जान की बाजी' हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात काम करण्यासाठी संजय दत्तने तयार दाखवली होती आणि यासाठी 50 लाख रुपये अडव्हान्स घेतले होते. मात्र पैसे भेटल्यानंतर संजय दत्तने काम करण्यास नकार दिला. नुरानी यांनी अनेक वेळा विनंती करूनही संजय दत्त काम करण्यास नकार दिला. या प्रकरणी अंडरवर्ल्डची लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहे अशी तक्रार निर्माता नुरानी यांनी केली होती. या प्रकरणी संजय दत्त विरोधात नुरानी यांनी याचिका दाखल केली. अंधेरी कोर्टाने या प्रकरणी संजय दत्तला समन्स बजावली होती. मात्र तो कोर्टात हजर झाला नाही. अखेर आज अंधेरी कोर्टाने संजय दत्तला अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मागिल महिन्यात 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात त्याला चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा नुरानी याची फसवणूक प्रकरणी संजय दत्तचा पाय आणखी खोलात गेलाय. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close