S M L

ज्येष्ठ पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं निधन

24 एप्रिलमुंबई : जुन्या जमान्यातल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं पवई येथील राहत्या घरी निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर या महान गायकीने काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आलं. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. 14 एप्रिल 1919 ला पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या शमशाद बेगम के.एल सहगल यांच्या जबरदस्त फॅन होत्या. सहगल यांचा देवदास त्यांनी तब्बल 14 वेळा पाहिला होता. 16 डिसेंबर 1947 ला लाहोरच्या पेशावर रेडिओवर त्यांनी आपलं पदार्पणातलं पहिलं गाणं गायलं. आपल्या कणीदार आवाजानं शमशाद बेगम यांनी पहिल्याच गाण्यात रसिकांची मनं जिंकून घेतली. आपण दिसायला सुंदर नाही, असं शमशाद बेगम यांना वाटायचं आणि त्यामुळेच इतका सुंदर आवाज असूनही त्या फोटो द्यायला मात्र फारशा तयार नसत. त्यामुळेच 1970 पर्यंत त्यांचा आवाज जरी घराघरात पोहोचला, तरी त्यांचा चेहरा मात्र फारसा कोणाला माहिती नव्हता. नौशाद, ओ.पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली गाणी अविस्मरणीय ठरली. शमशाद बेगम यांचा द क्राऊन एम्पिरियल थिएट्रिकल कंपनी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नावाचा एक ग्रुप होता. बेगम या ऑल इंडिया रेडिओसाठी देखील गायल्या. सी रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पहिलं पाश्चात्य गाणं गायचा मान देखील शमशाद बेगम यांना मिळाला. 2009 मध्ये त्यांना ओ.पी. नय्यर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:10 PM IST

ज्येष्ठ पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं निधन

24 एप्रिल

मुंबई : जुन्या जमान्यातल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं पवई येथील राहत्या घरी निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर या महान गायकीने काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आलं. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

14 एप्रिल 1919 ला पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या शमशाद बेगम के.एल सहगल यांच्या जबरदस्त फॅन होत्या. सहगल यांचा देवदास त्यांनी तब्बल 14 वेळा पाहिला होता. 16 डिसेंबर 1947 ला लाहोरच्या पेशावर रेडिओवर त्यांनी आपलं पदार्पणातलं पहिलं गाणं गायलं. आपल्या कणीदार आवाजानं शमशाद बेगम यांनी पहिल्याच गाण्यात रसिकांची मनं जिंकून घेतली. आपण दिसायला सुंदर नाही, असं शमशाद बेगम यांना वाटायचं आणि त्यामुळेच इतका सुंदर आवाज असूनही त्या फोटो द्यायला मात्र फारशा तयार नसत. त्यामुळेच 1970 पर्यंत त्यांचा आवाज जरी घराघरात पोहोचला, तरी त्यांचा चेहरा मात्र फारसा कोणाला माहिती नव्हता. नौशाद, ओ.पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली गाणी अविस्मरणीय ठरली. शमशाद बेगम यांचा द क्राऊन एम्पिरियल थिएट्रिकल कंपनी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नावाचा एक ग्रुप होता. बेगम या ऑल इंडिया रेडिओसाठी देखील गायल्या. सी रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पहिलं पाश्चात्य गाणं गायचा मान देखील शमशाद बेगम यांना मिळाला. 2009 मध्ये त्यांना ओ.पी. नय्यर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close