S M L

एकता कपूरच्या ऑफिस,घरावर आयकर खात्याचे छापे

30 एप्रिलमुंबई : टीव्ही सिरिअल आणि चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांच्या कार्यालयावर आणि घरावर इन्कम टॅक्स विभागाने मंगळवारी सकाळी 9 वाजता छापे टाकले आहे. या कारवाई पाठोपाठ एकता कपूरच्या कुटुबीयांच्या सदस्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे. आतापर्यंतची ही सगळ्याची मोठी इन्कम टॅक्सची कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. एकता कपूरचे वडील अभिनेते जिंतेद्र, भाऊ तुषार, यांच्या जूहू येथील बंगल्यावर छापे टाकण्यात आले आहे. तर तुषार कपूर यांच्या लिंकरोड कार्यालयावरही छापे टाकले आहेत. तसंच IT च्या अधिकार्‍यांनी बालाजी टेलिफिल्मचे कार्यालय, स्टुडिओ आणि एकता कपूर यांच्या खाजगी कार्यालयावर ही छापे टाकले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बालाजी टेलिफिल्मवर इन्कम टॅक्सने केलेली कारवाईही त्यांचा येणारा सिनेमा 'शुट आऊट ऍट वडाळा'मुळे झाली आहे. बालाजीच्या कार्यालयात टॅक्स चोरी आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. एकूण 8 ठिकाणीही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 100 अधिकारी तपासणी करत आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे टीव्ही सिरिअल इंडस्ट्रीज आणि बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:00 PM IST

एकता कपूरच्या ऑफिस,घरावर आयकर खात्याचे छापे

30 एप्रिल

मुंबई : टीव्ही सिरिअल आणि चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांच्या कार्यालयावर आणि घरावर इन्कम टॅक्स विभागाने मंगळवारी सकाळी 9 वाजता छापे टाकले आहे. या कारवाई पाठोपाठ एकता कपूरच्या कुटुबीयांच्या सदस्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे. आतापर्यंतची ही सगळ्याची मोठी इन्कम टॅक्सची कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे.

एकता कपूरचे वडील अभिनेते जिंतेद्र, भाऊ तुषार, यांच्या जूहू येथील बंगल्यावर छापे टाकण्यात आले आहे. तर तुषार कपूर यांच्या लिंकरोड कार्यालयावरही छापे टाकले आहेत. तसंच IT च्या अधिकार्‍यांनी बालाजी टेलिफिल्मचे कार्यालय, स्टुडिओ आणि एकता कपूर यांच्या खाजगी कार्यालयावर ही छापे टाकले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार बालाजी टेलिफिल्मवर इन्कम टॅक्सने केलेली कारवाईही त्यांचा येणारा सिनेमा 'शुट आऊट ऍट वडाळा'मुळे झाली आहे. बालाजीच्या कार्यालयात टॅक्स चोरी आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. एकूण 8 ठिकाणीही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 100 अधिकारी तपासणी करत आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे टीव्ही सिरिअल इंडस्ट्रीज आणि बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close