S M L

कर्णा द जनरस वॉरिअर हिंदी रंगभूमीवर

31 डिसेंबर, मुंबईमाधुरी निकुंभ कर्णाच्या आयुष्यावर आधारित एक हिंदी नाटक येत आहे. ' कर्णा द जनरस वॉरिअर ' हे त्या नाटकाचं नाव आहे. कर्णाच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवर प्रकाश टाकत हे नाटक पुढे सरकतं. हे नाटक बघताना कर्णाच्या आयुष्याच घडलेले प्रसंग डोळ्यासमोर येतात. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात 5 व्यक्तिरेखा आहेत. नाटकात पाचवी व्यक्तिरेखाही नाटक संपल्याशिवाय जात नाही. मणिपुरी, मार्शल आर्ट आणि त्याधल्या पेहरावांच्या या नाटकात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. " नाटकात एकाच व्यक्तीनं 4 व्यक्तिरेखा वठवल्या आहेत. या चार व्यक्तिरेखा वठवताना त्याने निरनिराळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला आहे. जेव्हा काळ्या रंगाच्या रुमाला हात लावला जातो तेव्हा दुर्याधनाची भूमिका रंगमंचावर सुरू होते. लाल रुमालाला हाम लावल्यावर दुशासनाची. लाईट्स आणि वाद्यांचा योग्य वापर करून नाटकात कर्णाची व्यक्तिरेखा रंगवण्यात आली आहे, " अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक कुलविंदर बक्षीश यांनी दिली. नाटकात बीजॉन हा कलाकार कर्णाची व्यक्तिरेखा साकारत आहे. कर्ण साकरताना आयुष्यातला प्रचंड प्रामाणिकपणा आणि सच्चाई माणसाला कशी घडवते याचा प्रत्यय येतो.' कर्णा द जनरस वॉरिअर ' मधून फक्त कर्णाचा इतिहास लोकांना न दाखवता महाभारतासारख्या महानग्रंथाचे संदर्भही यात देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टींचा संदर्भ सध्या समाजात घडणार्‍या घटनांसोबत जोडण्यात आल्यानं हे नाटक आजच्या काळाला अनुरुप ठरेल, असं वाटतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 11:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close