S M L

भारतीय सिनेमा @ 100

03 मेआज भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 100 वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. 1913 ते 1931 हा मूकपटांचा काळ होता. या काळात मुख्यत: पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक कथांवर आधारित सिनेमा होता. 1931 ला भारतीय सिनेमाचा पहिला बोलपट आला आलमआरा... आणि तेव्हापासून भारतीय सिनेमा बोलू लागला. बोलपटाच्या आगमनानंतर चित्रपटसृष्टीला खर्‍या अर्थाने भरभराटीचे दिवस आले. गेल्या 100 वर्षात अनेक उत्तम चित्रपट निर्माण झाले. त्यातून अनेत निर्माते,दिग्दर्शक, लेखक, गीतकार, छायाचित्रकार, संकलक, ध्वनिमुद्रक, तंत्रज्ञ कलांवत पुढे आले. या सिनेमांनी आणि सर्व कलावंतानी चित्रपट इतिहासावर आपली कायमस्वरूपी छाप सोडली. देशात, विदेशात अनेक मानसन्मान, पुरस्कार अगदी सिनेमातील मानाचा असा ऑस्करही मिळवला. आणि भारतीय सिनेमाला जगात गौरवशाली स्थान मिळवून दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:04 PM IST

भारतीय सिनेमा @ 100

03 मे

आज भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 100 वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला.

1913 ते 1931 हा मूकपटांचा काळ होता. या काळात मुख्यत: पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक कथांवर आधारित सिनेमा होता. 1931 ला भारतीय सिनेमाचा पहिला बोलपट आला आलमआरा... आणि तेव्हापासून भारतीय सिनेमा बोलू लागला. बोलपटाच्या आगमनानंतर चित्रपटसृष्टीला खर्‍या अर्थाने भरभराटीचे दिवस आले.

गेल्या 100 वर्षात अनेक उत्तम चित्रपट निर्माण झाले. त्यातून अनेत निर्माते,दिग्दर्शक, लेखक, गीतकार, छायाचित्रकार, संकलक, ध्वनिमुद्रक, तंत्रज्ञ कलांवत पुढे आले. या सिनेमांनी आणि सर्व कलावंतानी चित्रपट इतिहासावर आपली कायमस्वरूपी छाप सोडली. देशात, विदेशात अनेक मानसन्मान, पुरस्कार अगदी सिनेमातील मानाचा असा ऑस्करही मिळवला. आणि भारतीय सिनेमाला जगात गौरवशाली स्थान मिळवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2013 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close