S M L

रिव्ह्यु : चार आण्याची 'कथा' बारा आण्याचा मसाला

अमोल परचुरे, समिक्षक02 मेबालाजी टेलिफिल्म निर्मित 'शूटआऊट ऍट वडाळा' हा सिनेमा आहे मसाला आणि मारधाड आणि हॉट सिन्सनी भरपूर...फक्त ऍक्शन नाही तर मसाला सिनेमांमध्ये जे जे आवश्यक असतं ते सगळं यामध्ये आहे. खर्‍या अर्थाने पिटातल्या प्रेक्षकांसाठी किंवा सिंगल स्क्रीनसाठीचा सिनेमा असंच शूटआऊट ऍट वडाळाबद्दल सांगता येईल. काँटे, मुसाफिर, जिंदा अशा सिनेमांमधून वेगळ्या प्रकारची ऍक्शन पडद्यावर आणणारे संजय गुप्ता यांनी पुन्हा एकदा तोच मार्ग निवडलाय, पण यावेळी ऍक्शनच्या जोडीला आयटम साँग्ज आणि बेड सीन्सचा माराही त्यांनी केलेला आहे. एस हुसैन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकातल्या काही भागावर हा सिनेमा आधारित आहे. हा भाग म्हणजे गँगस्टर मन्या सुर्वेचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकात मुंबईतल्या डोंगरी ते दादर या भागात मन्या सुर्वेचं वर्चस्व होतं. प्रस्थापित गुंडांनाही त्याने हादरवून सोडलं होतं. हाच मन्या म्हणजे मनोहर सुर्वे खरंतर एक हुशार विद्यार्थी होता पण परिस्थितीमुळे तो अंडरवर्ल्डच्या दलदलीत सापडला. मन्याचा काटा काढण्यासाठी गुंड टोळ्या आणि पोलीसही बरेच प्रयत्न करत होते पण अखेर मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एन्काऊंटरचा वापर झाला आणि मन्या सुर्वेचा खात्मा करण्यात आला. आता यात मनोहर ते मन्या सुर्वे हा प्रवास, हतबल मुंबई पोलीस, मुंबईवर वर्चस्व गाजवण्यासाठी मन्याचे प्रयत्न, कंगना राणावत बरोबर प्रेमसंबंध आणि सगळ्याच्या मध्ये येणारी आयटम साँग्ज...एकंदरित, पुस्तक राहिलं बाजूला, आधी पब्लिकला काय पाहिजे ते बघूया असाच विचार संजय गुप्ताने केलेला दिसतो. पटकथा वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आयटम साँगसाठी कोणती अभिनेत्री चालेल यावरच जास्त खल झाला असणार. याचाच परिणाम मोठ्या पडद्यावर काय दिसतो तर चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला. 'सत्या', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' अशा सिनेमांमध्ये मन्या सुर्वे जरी नाही तरी तशा प्रकारचे अनेक संदर्भ आलेले आहेत. त्यामुळे ऍक्शन सोडल्यास कथेच्या पातळीवर फारसं नावीन्य यात नाही. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर अनिल कपूर या वयातही भाव खाऊन गेलेला आहे. मनोज वाजपेयीने सिनेमाच्या दर्जानुसार फारशी मेहनत घेतलेली नाही. सोनू सूद ठीकठाक वाटलाय. कंगना राणावतनेही पुन्हा एकदा अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय, पण मेकअपचा खूप थर असल्यामुळे चेहर्‍यावरचे हावभाव फारसे लक्षात येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते जॉन अब्राहमचं, पण पिळदार शरीर सोडलं तर त्याच्याकडे काहीच नाही. त्याने गांभीर्याने काम करण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतं पण ते चेहर्‍यावर दिसत तरी नाही. अर्थात, त्याच्या लोकप्रियतेमुळे, आयटम साँग्जमुळे, ऍक्शनमुळे आणि चटकदार संवादांमुळे सिनेमा हिट ठरणार असंच दिसतंय. 'शूटआऊट ऍट वडाळा'ला रेटिंग - 40

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:01 PM IST

रिव्ह्यु : चार आण्याची 'कथा' बारा आण्याचा मसाला

अमोल परचुरे, समिक्षक

02 मे

बालाजी टेलिफिल्म निर्मित 'शूटआऊट ऍट वडाळा' हा सिनेमा आहे मसाला आणि मारधाड आणि हॉट सिन्सनी भरपूर...फक्त ऍक्शन नाही तर मसाला सिनेमांमध्ये जे जे आवश्यक असतं ते सगळं यामध्ये आहे. खर्‍या अर्थाने पिटातल्या प्रेक्षकांसाठी किंवा सिंगल स्क्रीनसाठीचा सिनेमा असंच शूटआऊट ऍट वडाळाबद्दल सांगता येईल. काँटे, मुसाफिर, जिंदा अशा सिनेमांमधून वेगळ्या प्रकारची ऍक्शन पडद्यावर आणणारे संजय गुप्ता यांनी पुन्हा एकदा तोच मार्ग निवडलाय, पण यावेळी ऍक्शनच्या जोडीला आयटम साँग्ज आणि बेड सीन्सचा माराही त्यांनी केलेला आहे.

एस हुसैन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकातल्या काही भागावर हा सिनेमा आधारित आहे. हा भाग म्हणजे गँगस्टर मन्या सुर्वेचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकात मुंबईतल्या डोंगरी ते दादर या भागात मन्या सुर्वेचं वर्चस्व होतं. प्रस्थापित गुंडांनाही त्याने हादरवून सोडलं होतं. हाच मन्या म्हणजे मनोहर सुर्वे खरंतर एक हुशार विद्यार्थी होता पण परिस्थितीमुळे तो अंडरवर्ल्डच्या दलदलीत सापडला.

मन्याचा काटा काढण्यासाठी गुंड टोळ्या आणि पोलीसही बरेच प्रयत्न करत होते पण अखेर मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एन्काऊंटरचा वापर झाला आणि मन्या सुर्वेचा खात्मा करण्यात आला. आता यात मनोहर ते मन्या सुर्वे हा प्रवास, हतबल मुंबई पोलीस, मुंबईवर वर्चस्व गाजवण्यासाठी मन्याचे प्रयत्न, कंगना राणावत बरोबर प्रेमसंबंध आणि सगळ्याच्या मध्ये येणारी आयटम साँग्ज...

एकंदरित, पुस्तक राहिलं बाजूला, आधी पब्लिकला काय पाहिजे ते बघूया असाच विचार संजय गुप्ताने केलेला दिसतो. पटकथा वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आयटम साँगसाठी कोणती अभिनेत्री चालेल यावरच जास्त खल झाला असणार. याचाच परिणाम मोठ्या पडद्यावर काय दिसतो तर चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला.

'सत्या', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' अशा सिनेमांमध्ये मन्या सुर्वे जरी नाही तरी तशा प्रकारचे अनेक संदर्भ आलेले आहेत. त्यामुळे ऍक्शन सोडल्यास कथेच्या पातळीवर फारसं नावीन्य यात नाही. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर अनिल कपूर या वयातही भाव खाऊन गेलेला आहे. मनोज वाजपेयीने सिनेमाच्या दर्जानुसार फारशी मेहनत घेतलेली नाही.

सोनू सूद ठीकठाक वाटलाय. कंगना राणावतनेही पुन्हा एकदा अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय, पण मेकअपचा खूप थर असल्यामुळे चेहर्‍यावरचे हावभाव फारसे लक्षात येत नाहीत.

सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते जॉन अब्राहमचं, पण पिळदार शरीर सोडलं तर त्याच्याकडे काहीच नाही. त्याने गांभीर्याने काम करण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतं पण ते चेहर्‍यावर दिसत तरी नाही. अर्थात, त्याच्या लोकप्रियतेमुळे, आयटम साँग्जमुळे, ऍक्शनमुळे आणि चटकदार संवादांमुळे सिनेमा हिट ठरणार असंच दिसतंय.

'शूटआऊट ऍट वडाळा'ला रेटिंग - 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2013 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close